Anushka Sharma सोबत व्हिडिओ कॉलवर होता विराट कोहली, चाहत्यांना मोबाईल दाखवताच व्हायरल झाला व्हिडिओ

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर अनुष्का शर्माने विराट कोहलीशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला.
Anushka Sharma | Virat Kohli
Anushka Sharma | Virat Kohli Insta/ Anushka
Published on
Updated on

बॉलिवूड आणि क्रिकेट इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा एक लेटेस्ट व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विराटसह व्हिडीओ कॉलवर बोलतांना दिसत आहे. अलीकडेच विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. या सामन्यानंतर अनुष्का शर्माने विराटला व्हिडिओ कॉल केला, त्यादरम्यान कोहली क्रिकेटपटूंनी भरलेल्या बसमध्ये बसला होता. कोहलीला त्याच्या चाहत्यांनी घेरले होते आणि ते त्याच्या आवडत्या क्रिकेटरची एक झलक पाहण्यासाठी आतुर दिसत होते. दरम्यान, विराटने अनुष्काचा व्हिडिओ कॉल दाखवून चाहत्यांना दुप्पट आनंद दिला. 

आता या जोडप्याचा हा क्यूट व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, टीम इंडिया ग्रीनफील्ड स्टेडियमच्या बाहेर आली की कोहली बसमध्ये अनुष्काशी बोलण्यात व्यस्त झाला.

त्याचवेळी कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते स्टेडियमबाहेर जमले होते. कोहली आणि इतर खेळाडूंना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. कोहलीला पाहून ते आनंदाने ओरडू लागले, तेव्हा विराटनेआपला फोन चाहत्यांकडे वळवला, त्यावेळी तो अनुष्कासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होता, कोहलीला अनुष्काशी बोलताना पाहून चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या. 

Anushka Sharma | Virat Kohli
T20 World Cup: या राखीव खेळाडूला मिळणार Team India मध्ये स्थान!

अनुष्का आणि विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. अलीकडेच अनुष्काने तिचे काही लेटेस्ट फोटोही शेअर केले आहेत.

ज्यात ती कॅज्युअल लूकमध्ये दिसली होती. याशिवाय काही महिन्यांपूर्वी या जोडप्याचा एक स्कूटी व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघेही चेहरा लपवून हेल्मेट घालून मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसले होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com