Virat Kohli किशोर कुमारांच्या बंगल्यात सुरू करणार रेस्टॉरंट

विराट कोहली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या मुंबई, जुहू येथे एक मोठे रेस्टॉरंट सुरू करणार
Virat Kohli Kishore Kumar
Virat Kohli Kishore KumarDainik Gomantak

एका अहवालात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या भविष्यातील योजना उघड झाल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, कोहलीने मुंबई, जुहू येथील गौरी कुंजचा एक मोठा भाग भाड्याने घेतला आहे, जो सिनेमा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचे घर आहे. तेथे एक मोठे रेस्टॉरंट उघडण्याची कोहलीची योजना आहे.

किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ETimes शी बोलताना कुमार म्हणाले, "आम्ही ही जागा विराटला 5 वर्षांसाठी भाड्याने दिली आहे." ही जागा भाड्याने देण्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी सुरू झाली, जेव्हा लीना चंद्रावरकर यांचा मुलगा सुमीत विराटला भेटला होता.

Virat Kohli Kishore Kumar
Asia Cup 2022: पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यापूर्वी काय म्हणाले, रोहित, राहुल आणि विराट

अहवालात असे म्हटले आहे की, बंगल्याचे मोठ्या प्रमाणात नूतनीकरण केले जात आहे. आणि इथे लवकरच काहीतरी नविन सुरू होणार आहे. पुढील महिन्यात कधीही पाहुण्यांसाठी या बंगल्याचे दरवाजे उघडण्याची अपेक्षा आहे. कोहली आधीच One8 Commune नावाची प्रणाली योजना आखत आहे. रेस्टॉरंटचे अधिकृत इंस्टाग्राम बायोनुसार जुहूमध्ये ते आणखी एक शाखा उघडण्यास तयार आहे. या आधी त्याच्या दिल्ली, कोलकाता आणि पुणे येथे शाखा आहेत.

यापूर्वी त्यांनी दिल्लीत नुएवा रेस्टॉरंट सुरू केले होते. त्यात पूर्णपणे पंजाबी खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. यासोबतच हे दक्षिण अमेरिकन आणि इतर खंडातील पदार्थांसाठीही प्रसिद्ध आहे. याशिवाय विराटने इतर अनेक व्यवसायांमध्येही गुंतवणूक केली आहे. तो Wrogn या कपडे आणि फुटवेअर ब्रँडचा सह-संस्थापक देखील आहे. याशिवाय विराट यूएई रॉयल्सचा सह-संस्थापक आहे.

Virat Kohli Kishore Kumar
Ind Vs Hk: विराट अन् सूर्यकुमार यादवची पाकिस्तानी पत्रकाराने उडवली खिल्ली

त्याचवेळी कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील आपापल्या करिअरमध्ये व्यस्त आहेत. हाँगकाँगविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या सामन्यात कोहलीने आपल्या अर्धशतकात फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com