Virat Kohli Half Century Against Australia: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. भारतीय संघाने तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहलीने तुफानी खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने प्रशिक्षक राहुल द्रविडचा विक्रम मोडीत काढला.
विराट कोहलीने हा विक्रम मोडला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडिया एका टप्प्यावर अडचणीत आली होती, मात्र त्यानंतर विराट कोहलीने सूर्यकुमार यादवसोबत मोठी भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने 48 चेंडूत 3 चौकार आणि चार षटकारांसह 63 धावांची खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर कोहलीने प्रशिक्षक राहुल द्रविडला मागे टाकले. भारतासाठी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे.
राहुल द्रविडला मागे टाकले
भारताकडून सर्वाधिक धावा करणारा सचिन तेंडुलकर आहे. त्याच्यापाठोपाठ राहुल द्रविडचा क्रमांक लागतो, परंतु विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) 63 धावा करताच भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. विराटच्या आता 471 सामन्यांच्या 525 डावांमध्ये एकूण 24,078 धावा आहेत. भारताकडून (India) खेळताना द्रविडने 504 सामन्यांच्या 599 डावांमध्ये 24,064 धावा केल्या. द्रविड आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे टॉप 4 फलंदाज-
34357 धावा - सचिन तेंडुलकर
24078 धावा - विराट कोहली
24064 धावा - राहुल द्रविड
18433 धावा - सौरव गांगुली
विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे
आशिया चषक 2022 पासून विराट कोहली सातत्याने धावा करत आहे. टी-20 विश्वचषकातून त्याचे फॉर्ममध्ये येणे ही भारतीय संघासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेला तो भारताचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज आहे. विराट कोहली (Virat Kohli) जेव्हा आपल्या लयीत असतो, तेव्हा तो तुफान फटकेबाजी करतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.