पोलंड रशियावर 'खफा', FIFA वर्ल्ड कप क्वालिफायर फेरी खेळण्यास दिला नकार

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा (Russia-Ukraine Conflict) परिणाम आता हळूहळू क्रीडा जगतावरही दिसू लागला आहे.
FIFA
FIFADainik Gomantak

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा (Russia-Ukraine Conflict) परिणाम आता हळूहळू क्रीडा जगतावरही दिसू लागला आहे. रशियाच्या या निर्णयावर अनेक खेळाडूंनी जाहीरपणे टीका केली आहे. जगातील काही देशांनी रशियात खेळण्यासही नकार दिला असून आता त्यात पोलंडचाही यामध्ये समावेश झाला आहे. पोलंडच्या फुटबॉल महासंघाने आपला संघ पुढील महिन्यात रशियात होणाऱ्या विश्वचषक पात्रता फेरीत खेळणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांमधील हा सामना 24 मार्च रोजी रशियातील (Russia) मॉस्कोमध्ये होणार होता. (Poland Will Not Play In The FIFA World Cup Qualifiers In Russia)

दरम्यान, पोलंडशिवाय स्वीडन (Sweden) आणि चेक प्रजासत्ताक यांनाही मॉस्कोमध्येच विश्वचषक पात्रता फेरी खेळायची आहे. या दोन संघांमधील लढतीतील विजेत्याबरोबरच रशिया आणि पोलंडच्या (Poland) विजेत्याशीही सामना होणार आहे. मात्र, आता हे शक्य होईल असे काही वाटत नाही. पोलंडशिवाय स्वीडन आणि चेक रिपब्लिकनेही या सामन्यातून माघार घेण्याचा मूड बनवला आहे.

FIFA
मॅथ्यू हेडनने ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा लावला क्लास, पगार कपातीवरुन म्हणाला...

पोलंडचा संघ रशियाला जाणार नाही

पोलिश फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष केजरी कुलेस यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, 'कारवाई करण्याची वेळ आली आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आम्ही तिथे होणाऱ्या स्पर्धांवर बहिष्कार घालत आहोत. हा योग्य निर्णय असल्याचे आम्हाला वाटते. स्वीडन आणि चेक प्रजासत्ताक महासंघांसोबत जवळून काम करतील, जेणेकरुन तिन्ही देश एकत्र येऊन फिफाला त्यांच्या निर्णयाची माहिती देऊ शकतील.'

यावर पोलंडचे दिग्गज फुटबॉलपटू रॉबर्ट लेवांडोस्की म्हणाले, 'हा योग्य निर्णय आहे. युक्रेनमधील परिस्थिती लक्षात घेता आम्ही रशियन संघाविरुद्ध खेळण्याचा विचार करु शकत नाही. रशियाचे फुटबॉलपटू आणि चाहत्यांची चूक नाही, परंतु आम्ही काहीही घडत नाही, असे वागू शकत नाही.'

FIFA
विराटच्या फलंदाजीची ऑस्ट्रेलियन चॅनलने उडवली खिल्ली, वसीम जाफरने घेतला क्लास!

चॅम्पियन्स लीगचे यजमानपदही रशियाकडून हिसकावून घेण्यात आले

युक्रेनवर रशियाच्या आक्रमणानंतर, UEFA (Union of European Football Association) ने सेंट पीटर्सबर्गला चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्याच्या यजमानपदापासून दूर केले आहे. शुक्रवारी पॅरिसकडे या यजमानपदाची जबाबदारी सोपवली आहे. पुरुषांचा अंतिम सामना 28 मे रोजी पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार होणार होता. परंतु आता तो नवीन ठिकाणी सामन्यांचे आयोजन करण्यात येईल असही सांगण्यात येत आहे. UEFA कार्यकारी समितीच्या निर्णयानंतर 80,000 प्रेक्षकांची क्षमता असलेले स्टेड डी फ्रान्स हे त्याचे आयोजन करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com