India vs England, 4th Test: टीम इंडियाचा मायदेशात सलग 17 वा मालिका विजय, विराटनेही केलं रोहित ब्रिगेडचं अभिनंदन

Virat Kohli Post: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने टीम इंडियाच्या मायदेशातील सलग 17 वा मालिका विजयानंतर ट्वीट करत कौतुक केले आहे.
Team India | Virat Kohli
Team India | Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Team India securing 17th consecutive test series win at Home:

भारतीय संघाने सोमवारी (26 फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील चौथा सामना 5 विकेट्सने जिंकला. यासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतील विजयही निश्चित केला आहे. दरम्यान, भारताचा हा घरच्या मैदानांतील सलग 17 वा मालिका विजय आहे. या विजयानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही प्रतिक्रिया दिली आहे.

विराटने ट्वीट केले आहे की 'येस!!! युवा संघाने मिळवलेला अप्रतिम मालिका विजय. धैर्य, दृढनिश्चय आणि लवचिकता दिसून आली.'

विराटने यापूर्वीच या मालिकेतून वैयक्तिक कारणाने माघार घेतली आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे.

Team India | Virat Kohli
IND vs ENG: रुटची विकेट वादाच्या भोवऱ्यात! माजी इंग्लंड कर्णधाराने DRS वर व्यक्त केला राग, नंतर पोस्ट केली डिलीट

भारताचा मायदेशातील सलग 17 वा मालिका विजय

दरम्यान, भारताने 2013 पासून मायदेशात आत्तापर्यंत एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. 2013 पासून भारतीय संघ 17 कसोटी मालिका मायदेशात खेळला आहे. यातील एकाही कसोटी मालिकेत पराभव किंवा मालिका बरोबरीतही सुटलेली नाही.

भारताने सर्व 17 मालिकेत विजय मिळवला आहे. दरम्यान, मायदेशात सर्वाधिक सलग मालिका विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघ अव्वल क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे.

ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर 1994 ते जानेवारी 2001 दरम्यान मायदेशात सलग 10 मालिका जिंकल्या होत्या. तसेच जुलै 2004 ते नोव्हेंबर 2008 दरम्यान देखील ऑस्ट्रेलियाने सलग 10 मालिका मायदेशात जिंकल्या होत्या.

मायदेशात सलग कसोटी मालिका जिंकणारे संघ

  • 17 मालिका - भारत (22 फेब्रुवारी 2013 ते 26 फेब्रुवारी 2024)

  • 10 मालिका - ऑस्ट्रेलिया (25 नोव्हेंबर 1994 ते 2 जानेवारी 2001)

  • 10 मालिका - ऑस्ट्रेलिया (1 जुलै 2004 ते 28 नोव्हेंबर 2008)

  • 8 मालिका - वेस्ट इंडिज (10 मार्च 1976 ते 11 एप्रिल 1986)

  • 8 मालिका - न्यूझीलंड (1 डिसेंबर 2017 ते 3 जानेवारी 2021)

Team India | Virat Kohli
IND vs ENG, Test: इंग्लंडचे मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले, गिल-जुरेलने केला टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब

भारताचा विजय

सध्या चालू असलेल्या कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. परंतु, नंतरचे तिन्ही सामने भारताने जिंकले. त्यामुळे भारताने मालिकेतील विजय निश्चित केला आहे.

रांची कसोटीत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 104.5 षटकात सर्वबाद 353 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाला पहिल्या डावात 103.2 षटकात सर्वबाद 307 धावा करता आल्या. त्यामुळे इंग्लंडला ४६ धावांची आघाडी मिळाली.

नंतर इंग्लंडचा दुसरा डाव 53.5 षटकात अवघ्या 145 धावांवर गडगडला. पण पहिल्या डावात 46 धावांची आघाडी घेतल्याने भारतासमोर इंग्लंडने 192 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 61 षटकात 5 विकेट्स गमावत पूर्ण केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com