IND vs PAK: विराट-केएल राहुलने पाकिस्तानविरुद्ध विक्रमांचाही पाडला पाऊस, पाहा स्पेशल 7 रेकॉर्ड्स

KL Rahul - Virat Kohli: विराट कोहली आणि केएल राहुलने आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध शतके करण्याबरोबर अनेक विक्रमांनाही गवसणी घातली.
KL Rahul - Virat Kohli
KL Rahul - Virat KohliDainik Gomantak

Asia Cup 2023, India vs Pakistan, KL Rahul - Virat Kohli Records:

भारत विरुद्ध पाकिस्तान संघात कोलंबो येथे आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर फोरचा सामना झाला. हा सामना रविवारी सुरू झाला होता. पण पावसामुळे हा सामना रविवारी पूर्ण झाला नाही, त्यामुळे राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी उर्वरित सामना खेळवण्यात आला.

दरम्यान या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शतके केली. त्याचबरोबर खास विक्रमही नोंदवले.

या सामन्यात रोहित शर्मा 56 धावांवर आणि शुभमन गिल 58 धावांवर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांची जोडी जमली. त्यांनी शेवटपर्यंत पाकिस्तानी गोलंदाजांना यश मिळू न देता तिसऱ्या विकेटसाठी विक्रमी 233 धावांची नाबाद भागीदारी केली. त्यामुळे भारताने 50 षटकात 2 बाद 356 धावा केल्या.

भारताकडून केएल राहुलने या सामन्यात 106 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 111 धावा केल्या आहेत. तसेच विराटने 94 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 122 धावांची नाबाद खेळी केली.

KL Rahul - Virat Kohli
IND vs PAK: रोहित-गिलनंतर कोहली-राहुलचाही पाकिस्तानी गोलंदाजांना दणका! वनडेत चौथ्यांदाच झाला 'हा' पराक्रम

विराट आणि केएल राहुलने केलेले विक्रम

  • विराटचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 77 वे शतक आहे, तर वनडेमधील 47 वे शतक आहे. त्याच्यापुढे आता केवळ सचिन तेंडुलकर आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके केली आहे, ज्यात 49 वनडे शतकांचा समावेश आहे.

  • केएल राहुलचे हे वनडेतील सहावे शतक ठरले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 15 वे शतक ठरले आहे.

  • विराट कोहलीने ही शतकी खेळी करताना 13 हजार वनडे धावाही पूर्ण केल्या आहेत. तो 13 हजार धावा करणारा जगातील 5 वा खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी सचिन तेंडुलकर (18426), कुमार संगकारा (14234), रिकी पाँटिंग (13704) आणि सनथ जयसूर्या (13430) यांनी हा टप्पा पार केला आहे.

  • वनडेत सर्वात जलद 13 हजार धावा करणारे खेळाडू (डावांनुसार)

  • 267 डाव - विराट कोहली

  • 321 डाव - सचिन तेंडुलकर

  • 341 डाव - रिकी पाँटिंग

  • 363 डाव - कुमार संगकारा

  • 416 डाव - सनथ जयसूर्या

  • भारतासाठी सर्वाधिक वेळा एका वर्षात 1000 धावांचा टप्पा पार करणारे खेळाडू

  • 16 वेळा - सचिन तेंडुलकर

  • 12 वेळा - विराट कोहली

  • 11 वेळा - राहुल द्रविड

  • 11 वेळा - एमएस धोनी

KL Rahul - Virat Kohli
IND vs PAK: पाकिस्तानला रातोरात तगडा झटका! भारताविरुद्ध एक गोलंदाज कमी घेऊन खेळणार, कारण...
  • आशिया चषकातील सर्वोच्च भागीदारी

  • 233* धावा - विराट कोहली - केएल राहुल (भारत विरुद्ध पाकिस्तान, 2023)

  • 224 धावा - मोहम्मद हाफिज - नासिर जमशेद (पाकिस्तान विरुद्ध भारत, 2012)

  • 223 धावा - शोएब मलिक - युनूस खान (पाकिस्तान विरुद्ध हाँग काँग, 2004)

  • 214 धावा - बाबर आझम - इफ्तिखार अहमद (पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, 2023)

  • 213 धावा - विराट कोहली - अजिंक्य रहाणे (पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, 2014)

  • भारताकडून वनडेत तिसऱ्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी

  • 237* धावा - राहुल द्रविड - सचिन तेंडुलकर (भारत विरुद्ध केनिया, 1999)

  • 233* धावा - विराट कोहली - केएल राहुल (भारत विरुद्ध पाकिस्तान, 2023)

  • 224 धावा - गौतम गंभीर - विराट कोहली (भारत विरुद्ध श्रीलंका, 2009)

  • पाकिस्तानविरुद्ध भारताकडून वनडतील सर्वोच्च भागीदारी

  • 233* धावा - विराट कोहली - केएल राहुल (कोलंबो, 2023)

  • 231 धावा - नवज्योत सिंग सिद्धू - सचिन तेंडुलकर (शारजाह, 1996)

  • 210 धावा - शिखर धवन - रोहित शर्मा (दुबई, 2018)

  • 201 धावा - राहुल द्रविड - विरेंद्र सेहवाग (कोची, 2005)

  • आशिया चषकात सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू

  • 6 शतके - सनथ जयसूर्या

  • 4 शतके - विराट कोहली

  • 4 शतके - कुमार संगकारा

  • 3 शतके - शोएब मलिक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com