ICC Test Rankings: टेस्टमध्ये विराट बाबरपेक्षा बेस्टच!

वॉर्नर सहाव्या क्रमांकावर पोहोचला असून विराट आता सातव्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम कसोटी क्रमवारीत 9 स्थानांवर पोहोचला आहे.
Virat Kohli is Better than Babar Azam in ICC Test Ranking

Virat Kohli is Better than Babar Azam in ICC Test Ranking

Dainik Gomantak 

Published on
Updated on

अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत 74 धावांची शानदार खेळी खेळणाऱ्या मार्नस लॅबुशेनने आयसीसी कसोटी क्रमवारीत स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) मागे टाकले आहे. अ‍ॅशेसच्या पहिल्या कसोटीत अर्धशतक झळकावल्यानंतर लॅबुशेनने (Marnus Labuschen) आयसीसी क्रमवारीत (ICC Test Rankings) दुसऱ्या स्थानांवर झेप घेतली आहे. लॅबुशेन आता जगातील नंबर 2 कसोटी क्रमवारीत फलंदाज बनला आहे. जो रुट पहिल्या क्रमांकावर तर स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर आणि केन विल्यमसन (Kane Williamson) चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही (David Warner) कसोटी क्रमवारीत तीन स्थानांनी झेप घेतली असून त्याने भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकले आहे. वॉर्नर सहाव्या क्रमांकावर पोहोचला असून विराट आता सातव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची (Babar Azam) कसोटी क्रमवारीत 9 स्थानांवर पोहोचला आहे. अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा ट्रॅव्हिस हेड पहिल्या दहामध्ये पोहोचला आहे. ट्रॅव्हिस हेडने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात 152 धावांची तुफानी इनिंग खेळली होती.

<div class="paragraphs"><p>Virat Kohli is Better than Babar Azam in ICC Test Ranking</p></div>
आरोप-प्रत्यारोपानंतर विराट कोहलीचा मोठा गौफ्यस्फोट

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीनेही (Shaheen Afridi) कसोटी क्रमवारीत आघाडी घेतली आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करणारा आफ्रिदी तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, जे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग आहे. डेव्हिड मलान (David Malan) पुन्हा एकदा T20 क्रमवारीत जगातील नंबर वन फलंदाज बनला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला, ज्याचा फटका त्याला सहन करावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com