धन्यवाद! बाबरचं 'विराट' प्रेम पाहून कोहलीने दिलं ट्विटला उत्तर

बाबरने शुक्रवारी हे ट्विट केले होते. यावर कोहलीने शनिवारी उत्तर दिले आहे.
Babar Azam & Virat Kohli
Babar Azam & Virat KohliDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

टीम इंडियामधील (Team India) दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. तर पाकिस्तानचा क्रिकेटर बाबर आझमने कोहलीसाठी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने कोहलीला खंबीर राहण्यास सांगितले आहे. बाबरने शुक्रवारी हे ट्विट केले होते. यावर कोहलीने शनिवारी उत्तर दिले आहे. बाबरच्या ट्विटला कोहलीने उत्तर द्यावे, अशी प्रतिक्रिया शाहिद आफ्रिदीने नुकतीच दिली होती. (Virat Kohli has replied to Babar Azam tweet)

Babar Azam & Virat Kohli
भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर असे 5 विक्रम, जे कोणीही मोडू शकणार नाहीत!

बाबरने कोहलीसोबतचा एक फोटो ट्विट केला होता आणि लिहिलं होतं की, ‘ही वेळ निघून जाईल, तुम्ही खंबीर राहा.’ बाबरच्या ट्विटला कोहलीने आज उत्तर दिलं आहे. त्याचे आभार मानत विराटने लिहिले की, “धन्यवाद. चमकत राहा आणि पुढे जात रहा तुम्हालाही शुभेच्छा.''

पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझमच्या ट्विटनंतर माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने यावर प्रतिक्रिया व्यक्त करत कोहलीने यावर उत्तर द्यावे, असे म्हटले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो म्हणाला की, “बाबर आझमने विराटसाठी ट्विट करून खूप चांगला संदेश दिला आहे तर त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली की नाही हे मला माहीत नाहीये पण माझ्या मते यावर कोहलीने उत्तर दिले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com