भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर असे 5 विक्रम, जे कोणीही मोडू शकणार नाहीत!

भारतीय क्रिकेट संघाने 1932 साली पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत 1000 हून अधिक खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
Five Unbreakable Records by indian players
Five Unbreakable Records by indian playersDainik Gomantak
MS Donhi
MS DonhiDainik Gomantak

महेंद्रसिंग धोनी (MS Donhi) हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. भारताचा माजी कर्णधार धोनी हा आतापर्यंतचा सर्वोत्तम फिनिशर म्हणून ओळखला जातो. 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत रांचीच्या राजकुमारने अनेक विक्रम केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे विकेटच्या मागील स्टंपिंग. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 195 स्टंपिंग केले आहेत, जो एक विश्वविक्रमच आहे. धोनी यष्टीमागे स्टंपिंग करताना चपळाई दाखवायचा. त्याने वनडे सामन्यात 123, टी-20 मध्ये 34 आणि कसोटीत 38 खेळाडूंना स्टंपिंगच्या अद्भभूत खेळीतून पवेलीयनचा रस्ता दाखवला आहे. सध्या धोनीच्या या विश्वविक्रमाच्या जवळपासही कोणी नाहीये.

Sachin Tendulkar)
Sachin Tendulkar)Dainik Gomantak

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) तर या खेळाचा बादशाह आहे. सचिनने आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा यश संपादन केले आहे. सचिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके देखील आहेत. तेंडुलकरने कसोटीत 51 आणि वनडे सामन्यात 49 शतके झळकावली आहेत. मास्टर ब्लास्टरचा हा विक्रम मोडणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नाहीये.

Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

जागतिक क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्याच्या काळातील स्फोटक सलामीवीरांपैकी एक आहे. सलामीवीर म्हणून रोहितने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. 35 वर्षीय रोहितच्या नावावर एकदिवसीय सामन्यात 264 धावांची खेळी खेळण्याचा विश्वविक्रम देखील आहे. रोहितने 8 वर्षांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध 173 चेंडूमध्ये ही विक्रमी खेळी खेळली होती. रोहितचा हा विक्रम मोडणे कोणत्याही खेळाडूला अशक्यच आहे.

Rahul Dravid
Rahul DravidDainik Gomantak

भारतीय क्रिकेट संघाची भिंत असलेल्या राहुल द्रविडने (Rahul Dravid) आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. 16 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत, द्रविडने सर्वाधिक चेंडूंचा सामना केला आणि सर्वाधिक वेळ क्रीजवर घालवला आहे. द्रविडसमोर गोलंदाजी करणे देखील फार कठीण होते. द्रविडने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 31, 258 चेंडूंचा सामना केला आहे. तर अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने अवघ्या 164 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. या कालावधीत द्रविडने एकूण 44,152 मिनिटे क्रीजवर घालवली आहेत म्हणजेच याचा अर्थ असा की राहूल द्रविड सुमारे 736 तास क्रीजवर राहिला, हा एक विश्वविक्रम द्रविडच्या नावावर आहे.

Bapu Nadkarni
Bapu NadkarniDainik Gomantak

सध्याच्या क्रिकेट चाहत्यांना बापू नाडकर्णी (Bapu Nadkarni) यांच्याबद्दल फारसे माहिती नाहीये. साठच्या दशकामध्ये या दिग्गज अष्टपैलू खेळाडूच्या फिरकी चेंडूंचा सामना करणे फलंदाजांसाठी सोपे नव्हते. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाच्या नावावर कसोटी सामन्यात सलग 21 ओव्हर मेडन टाकण्याचा विश्वविक्रम आहे. बापू नाडकर्णी यांनी 12 जानेवारी 1964 रोजी मद्रास, आताचे चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड (भारत विरुद्ध इंग्लंड) विरुद्ध सलग 21 ओव्हर मेडन्स टाकल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com