बेंगलोरच्या KGF ची कमाल! फिफ्टी ठोकत IPL मध्ये पहिल्यांदाच केलाय 'असा' पराक्रम

RCB vs LSG: आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध अर्धशतके केली.
Faf du Plessis | Virat Kohli
Faf du Plessis | Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना झाला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी कमालीचा खेळ करत अर्धशतके ठोकली.

तिघांनीही अर्धशतके केली असल्याने असे पहिल्यांदाच घडले आहे की आयपीएलमध्ये आरसीबीच्या पहिल्या तीन क्रमांकावरील फलंदाजांनी अर्धशतके केली आहेत.

दरम्यान आयपीएलमध्ये एका डावात पहिल्या तीन क्रमांकावरील फलंदाजांनी अर्धशतके करण्याची ही पाचवी वेळ होती. यापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून असा विक्रम दोन वेळा झाला आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांकडून प्रत्येकी एकदा असा विक्रम झाला आहे.

Faf du Plessis | Virat Kohli
राशिद खान IPL मध्ये Hat-Trick घेणारा तब्बल 19 वा खेळाडू, पाहा रेकॉर्डची संपूर्ण लिस्ट

आयपीएलमध्ये एका डावात पहिल्या तीन क्रमांकावरील फलंदाजांची अर्धशतके -

  • माहेला जयवर्धने (55), विरेंद्र सेहवाग (73) केवीन पीटरसन (50*) - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली, 2012

  • डेव्हिड वॉर्नर (51), शिखर धवन (77), केन विलियम्सन (54*) - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स, मोहाली, 2017

  • शुभमन गिल (76), ख्रिस लीन (54), आंद्र रसेल (80*) - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, कोलकाता, 2019

  • यशस्वी जयस्वाल (54), जोस बटलर (54), संजू सॅमसन (55) - राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, हैदराबाद, 2023

  • विराट कोहली (61), फाफ डू प्लेसिस (71*), ग्लेन मॅक्सवेल (52*) - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, बंगळुरू, 2023

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. या आमंत्रणाचा स्विकार करत आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली सलामीला फलंदाजीसाठी उतरले.

Faf du Plessis | Virat Kohli
IPL 2023: पंजाबच्या सेनापतीचा 'वन मॅन शो'! धवन @99 नॉटआऊट, 'या' खेळाडूंही केलाय असा अनोखा विक्रम

या दोघांनीही आरसीबीला दमदार सुरुवात करून दिली. एकिकडे विराटने आक्रमण केले असताना दुसरी बाजू फाफने चांगल्याप्रकारे सांभाळली होती. त्यांची भागीदारी रंगत असतानाच विराटने त्याचे आयपीएलमधील 46 वे अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर काहीवेळातच त्याला अमित मिश्राने 12 व्या षटकात बाद केले. विराट 44 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 61 धावा करून बाद झाला. विराट आणि फाफ यांच्यात सलामीला 96 धावांची भागीदारी झाली.

पण यानंतर फाफने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत तुफानी खेळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याला ग्लेन मॅक्सवेलनेही आक्रमक खेळत चांगली साथ दिली. या दोघांनीही अर्धशतके झळकावली. दरम्यान, त्यांची जोडी अखेरच्या षटकात मार्क वूडने मॅक्सवेलला बाद करत तोडली. मॅक्सवेल आणि फाफ यांच्यात 115 धावांची भागीदारी झाली.

दरम्यान मॅक्सवेलने 29 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांसह 59 धावांची खेळी केली. तसेच फाफने 46 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 79 धावांची खेळी केली. त्यामुळे आरसीबीने 20 षटकात 2 बाद 212 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com