फलंदाजीत अपयशी ठरलेला विराट मैदानात कर्णधाराच्या भूमिकेत दिसला

विराट कोहली पाच वर्षांनंतर आयपीएलमध्ये गोल्डन डकवर आऊट झाला.
Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak
Published on
Updated on

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात 19 एप्रिल रोजी सामना झाला. सामन्यादरम्यान विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने सर्वांची निराशा झाली. (Virat Kohli becomes temporary captain of RCB)

Virat Kohli
VIDEO: मैदानावर झाला अजबच ड्रामा, शेवटच्या क्षणी डीआरएसने घेतली राहुलची विकेट

मात्र, फलंदाजीत अपयशी ठरलेला विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा मैदानावर कर्णधाराच्या भूमिकेत दिसला. लखनऊ सुपर जायंट्सचा डाव संपत असताना फाफ डू प्लेसिस मैदानात काही काळ उपस्थित नव्हता. याकाळात फाफच्या जागी आरसीबीचे (RCB) नेतृत्व विराट कोहलीने केले.

Virat Kohli
मजबूत संघ बांधणीचा निर्धार, एफसी गोवाच्या आक्रमक शैलीला पसंती

स्टँड-इन-कर्णधार म्हणून तो काही षटकांसाठी आरसीबीचे नेतृत्व करताना दिसला. विराट कोहलीने 2021 मध्येच आरसीबीचे कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत या हंगामाच्या सुरुवातीला आरसीबीला नवीन कर्णधाराच्या शोधात होते. मेगा लिलावात आरसीबीने फाफ डू प्लेसिसला सात कोटी रुपयांना खरेदी केले. नंतर संघाने त्याला कर्णधार म्हणून घोषित केले. लखनऊ (Lucknow) सुपर जायंट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात फाफ डू प्लेसिसने 96 धावा केल्या, ज्यात 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर तो या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला. विराट कोहली पाच वर्षांनंतर आयपीएलमध्ये गोल्डन डकवर आऊट झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com