मजबूत संघ बांधणीचा निर्धार, एफसी गोवाच्या आक्रमक शैलीला पसंती

फुलबॅक या नात्याने खेळत असताना माझा नेहमीच आक्रमकतेवर
Carlos Pena| FC Goa
Carlos Pena| FC GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : एफसी गोवा संघ आक्रमक शैलीतील सहजसुंदर फुटबॉल खेळण्यासाठी ओळखला जातो. मुख्य प्रशिक्षक या नात्याने आपली याच तत्त्वज्ञानास पसंती राहील, अशी ग्वाही कार्लोस पेनया यांनी मंगळवारी दिली. आगामी मोसमासाठी मजबूत संघ बांधणी करण्याचा निर्धारही स्पॅनिश मार्गदर्शकाने व्यक्त केला.

एफसी गोवाच्या मुख्य प्रशिक्षकपदी 38 वर्षीय पेनया यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेद्वारे संवाद साधला. दोन वर्षांपूर्वी एफसी गोवाच्या बचावफळीत खेळाडू या नात्याने आधारस्तंभ ठरल्यानंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर स्पेनमध्ये मार्गदर्शनकाच्या भूमिकेत अनुभव घेतल्यानंतर पेनया गोव्यात प्रशिक्षक बनून पुन्हा येत आहेत.

विजयी मानसिकतेस प्राधान्य

``झिको, सर्जिओ लोबेरा, हुआन फेरांडो, डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना एफसी गोव्याच्या खेळण्याच्या शैलीत बदल झाला नाही. आक्रमक फुटबॉल खेळण्याचे तत्त्वज्ञान कायम राहिले, तीच संकल्पना यापुढेही कायम राहील. आक्रमणावर भर देत विजयासाठी प्रयत्नरत राहत मनोरंजनात्मक फुटबॉल खेळण्याचेच उद्दिष्ट्य राहील. विजयी मानसिकता आणि पहिल्या चार संघांत स्थान मिळविणे हेच आगामी मोसमातील ध्येय असेल,`` असे एफसी गोवातर्फे 43 आयएसएल सामने खेळलेले पेनया म्हणाले.

Carlos Pena| FC Goa
तरुण तेजपालच्या सुटकेविरोधात हायकोर्टाने राखून ठेवला आदेश

समतोल संघाची संकल्पना

``फुलबॅक या नात्याने खेळत असताना माझा नेहमीच आक्रमकतेवर भर असायचा. प्रशिक्षक म्हणून संघाकडूनही माझी हीच अपेक्षा असेल. माझा संघ चेंडूवर वर्चस्व राखून खेळताना, सामन्यात पुढाकार घेणारा आणि सक्रिय राहताना आवडेल. अपेक्षित गोष्टी घडेपर्यंत वाट पाहणे मला आवडत नाही. माझा संघ आक्रमण आणि बचावात समतोल असेल,`` असे पेनया यांनी प्रशिक्षक या नात्याने संकल्पना विषद केली.

युवा विकासावरही भर

``युवा खेळाडूंप्रती एफसी गोवाची मूल्ये आणि दृष्टिकोन मला भावतो. त्या अनुषंगाने मी संघाची वाढ व्हावी यासाठी योगदान देईन. या संघातर्फे खेळत असताना युवा खेळाडूंसमवेत काम करताना आनंद लुटला. या क्लबमध्ये युवा खेळाडूंच्या विकासासाठी कटीबद्ध असलेले प्रशिक्षक व अधिकारी आहेत,`` असे पेनया यांनी नमूद केले.

गतमोसमात सातत्याचा अभाव

गतमोसमात एफसी गोवाचे सामने आपण पाहिले. संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव राहिला, त्यामुळे आयएसएल गुणतक्त्यात नवव्या क्रमांकावर घसरण झाली, असे निरीक्षण पेनया यांनी मागील मोसमातील संघाच्या कामगिरीविषयी निरीक्षण नोंदविले. संघाला बऱ्याच गोष्टी मारक ठरल्या. मुख्य प्रशिक्षक मध्येच संघ सोडून गेले. डेरिक (परेरा) यांनी उपलब्ध पर्यायांसह चांगले काम केले, असेही ते म्हणाले.

``माझ्यामते, पुन्हा येथे येण्यासाठी माझ्यासाठी ही अतियश योग्य वेळ आहे. मी पूर्णपणे सज्ज आहे. एफसी गोवाची प्रगती व्हावी या उद्देशाने माझे सारे ज्ञान वापरण्यासाठी मी प्रयत्न करत राहीन.``- एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com