Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

T20 World Cup 2022 नंतर विराट घेणार निवृत्ती! या वक्तव्याने उडाली खळबळ

Virat Kohli, T20 World Cup 2022: आशिया चषक 2022 मध्ये विराट कोहलीने शानदार प्रदर्शन केले आहे.
Published on

Virat Kohli, T20 World Cup 2022: आशिया चषक 2022 मध्ये विराट कोहलीने शानदार प्रदर्शन केले आहे. या स्पर्धेपूर्वी तो अतिशय खराब फॉर्ममधून जात होता. परंतु आशिया चषक 2022 मध्ये विराट कोहलीचा जलवा पाहायला मिळाला. या सगळ्या दरम्यान असे एक वक्तव्य समोर आले आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हे वक्तव्य विराट कोहलीच्या निवृत्तीसंबंधी आहे.

विराटच्या निवृत्तीवर धक्कादायक वक्तव्य

विराट नुकताच फॉर्ममध्ये परतला आहे. आशिया चषक 2022 च्या शेवटच्या सामन्यात त्याने पहिले टी-20 शतकही झळकावले. या सगळ्यामध्ये पाकिस्तानचा (Pakistan) माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे (Shoaib Akhtar) एक धक्कादायक वक्तव्य समोर आले आहे. शोएब अख्तरला विश्वास आहे की, विराट कोहली T20 विश्वचषक 2022 नंतर T20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करेल.

Virat Kohli
T20 World Cup 2022 साठी पाकिस्तानचा संभाव्य संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी

निवृत्तीची वाट पाहत आहे

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर लाइव्ह सत्रादरम्यान विराट कोहलीच्या निवृत्तीवर म्हणाला, 'विराट टी-20 विश्वचषक 2022 नंतर टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेईल. तो हे करु शकतो, जेणेकरुन त्याला क्रिकेटच्या इतर फॉरमॅटवर जास्त लक्ष केंद्रित करता येईल. त्याच्या जागी मी असतो तर, भविष्याचा विचार करुन हाच निर्णय घेतला असता.' शोएब अख्तरला विश्वास आहे की, 'एक फॉर्मेट सोडून विराट जास्त काळ क्रिकेट खेळू शकतो.'

असे शाहिद आफ्रिदीनेही म्हटले

अलीकडेच, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही (Shahid Afridi) विराटला निवृत्तीचा सल्ला दिला होता. एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलशी संवाद साधताना आफ्रिदी म्हणाला होता की, 'विराट कोहलीने आपल्या करिअरची चांगली सुरुवात केली आहे. त्याने आपले नाव बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो चॅम्पियन खेळाडू आहे. पण एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही निवृत्तीकडे वाटचाल करत असता. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या करिअरच्या शिखरावर असताना निवृत्तीची घोषणा केली पाहिजे.'

Virat Kohli
ICC T20 World Cup: ऋषभ पंतला ओपनिंग करण्याची संधी द्यावी, वसीम जाफरचा रोहितला सल्ला

दुसरीकडे, विराट कोहलीने आतापर्यंत 104 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 51.94 च्या सरासरीने 3584 धावा केल्या आहेत. कोहलीने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 32 अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही 138.37 राहिला आहे. त्याच वेळी, आशिया कप 2022 मध्ये विराट कोहलीने 5 सामने खेळले आणि 92 च्या सरासरीने 276 धावा केल्या. ज्यामध्ये कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध 122 धावांची इनिंग खेळली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com