Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे दुर्घटनेवर कोहलीचे भावूक ट्विट; 'या' क्रिकेटपटूंनीही व्यक्त केला शोक

शुक्रवारी ओडिशात झालेल्या गंभीर रेल्वे अपघाताबद्दल विराट कोहलीसह अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी दु:ख व्यक्त केले आहे.
Virat Kohli | Train Accident
Virat Kohli | Train AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli Express Grief Over Odisha Train Accident: भारतभरात सध्या ओडिशामध्ये घडलेल्या रेल्वे अपघाताने शोककळा पसरली आहे. या गंभीर अपघातात शकडो लोकांना जीव गमवाव लागला आहे. त्यामुळे फक्त भारतातूनच नाही, तर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. भारतीय क्रिकेटपटूंनीही याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी हावडाहून चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि मालगाडी यांचा एकमेकांना धडकून मोठा अपघात झाला. या अपघातात मोठी जीवितहानी झाली आहे.

सध्या समोर आलेल्या आकड्यांनुसार या अपघातात मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर, 900 हून अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Virat Kohli | Train Accident
Odisha Train Accident: ओडिशातील रेल्वे अपघाताबद्दल इटलीच्या दूतावासाने व्यक्त केला शोक

या गंभीर अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करताना विराट कोहलीने ट्वीट केले आहे की 'ओडिशामध्ये झालेल्या गंभीर रेल्वे अपघाताबद्दल ऐकून वाईट वाटले. ज्या कुटुंबियांनी त्यांच्या जवळच्या लोकांना या अपघातात गमावले आहे, त्यांच्याबरोबर माझ्या संवेदना आहेत. तसेच जखमी झालेले नागरिक लवकर बरे व्हावेत, अशी मी आशा करतो.'

विराट सध्या 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडमध्ये आहे.

याशिवाय युवराज सिंगने ट्वीट केले आहे की 'ओडिशा रेल्वे अपघातात ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबाप्रती मी शोक व्यक्त करतो. तसेच मी प्रार्थना करतो की जखमी झालेले नागरिक लवकर बरे व्हावेत.'

Virat Kohli | Train Accident
Odisha Train Accident: ओडिशात भीषण ट्रेन अपघात, 288 ठार 900 हून अधिक जखमी; 10 पॉइंट्समधून समजून घ्या संपूर्ण घटनाक्रम

व्हीव्हीएस लक्ष्मणने लिहिले की 'ओडिशातील या अत्यंत दुर्दैवी अपघाताबद्दल जाणून अतिशय वाईट वाटले. मी जखमी नागरिक त्वरीत बरे होण्यासाठी प्रार्थना करतो आणि ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासाठी मी मनापासून शोक व्यक्त करतो.'

याशिवाय माजी भारतीय क्रिकेटपटू आणि दिल्लीतील खासदार गौतम गंभीरने ट्वीट केले की 'ओडिशातील जीवितहानीमुळे दु:ख होत आहे. देव पीडितांच्या कुटुंबीयांना शक्ती देवो. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशा शुभेच्छा. देश तुमच्या पाठीशी उभा आहे.'

याशिवाय देखील अनेक क्रिकेटपटूंनी दु:ख व्यक्त केले आहे.

दरम्यान, या अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये पीएम नॅशनल रिलीफ फंड (PMNRF) मधून अतिरिक्त नुकसान भरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com