Odisha Train Accident: ओडिशात भीषण ट्रेन अपघात, 288 ठार 900 हून अधिक जखमी; 10 पॉइंट्समधून समजून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Odisha Train Accident: ओडिशामध्ये शुक्रवारी संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. बालासोर येथील स्थानकाजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात धडक झाली.
Odisha Train Accident
Odisha Train AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Odisha Train Accident: ओडिशामध्ये शुक्रवारी संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. बालासोर येथील स्थानकाजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात धडक झाली. या दोन्ही गाड्यांची टक्कर इतकी जोरदार होती की, कोरोमंडल ट्रेन रेल्वे रुळावरुन खाली उतरली.

रेल्वेचे अनेक डब्बे रेल्वे रुळावरुन खाली घसरले. प्रवाशांना काही कळेपर्यंत यशवंतपूरहून हावड्याला जाणारी ट्रेन या डब्यांना धडकली.

यानंतर त्या ट्रेनच्या 3-4 बोगीही रुळावरुन घसरल्या. तीन गाड्यांच्या धडकेनंतर डबे रुळांवर पत्त्यासारखे विखुरले गेले.

खालील दहा मुद्यांच्या माध्यमातून समजून घेऊया घटनाक्रम

1- ओडिशाचे (Odisha) मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी बचावकार्य करत आहे. तिथे 600-700 बचाव दल कार्यरत आहेत. जखमींना वाचवणे आणि त्यांच्यावर उपचार करणे हे आमचे प्राधान्य आहे.

2- अपघातानंतर बालासोर शहरातील सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. घटनास्थळी 50 रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या, मात्र जखमींची वाढती संख्या लक्षात घेता बसेसचीही व्यवस्था करण्यात आली. स्थानिक डॉक्टरांशिवाय इतर जिल्ह्यातील 50 डॉक्टरांनाही बालासोरला पोहोचण्यास सांगण्यात आले आहे.

Odisha Train Accident
Odisha Train Accident: ओडिशातील रेल्वे अपघातात 233 जणांचा मृत्यू; राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर

3- बालासोर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे, असे ओडिशाचे विशेष मदत आयुक्त सत्यव्रत साहू यांनी सांगितले.

त्याचवेळी, ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की, जखमींना सोरो, गोपालपूर आणि खंतापाडा आरोग्य केंद्रातही दाखल करण्यात येत आहे.

4- बालासोर रेल्वे अपघातावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि काँग्रेस अध्यक्षांसह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला आहे तर 900 हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये पीएम नॅशनल रिलीफ फंड (PMNRF) मधून अतिरिक्त नुकसान भरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.

5- पीटीआयच्या एका पत्रकाराने सांगितले की, रुळावरुन घसरलेल्या डब्यांमध्ये बरेच लोक अडकले होते आणि स्थानिक लोक त्यांना वाचवण्यासाठी बचाव पथकाला मदत करत होते, परंतु अंधारामुळे ऑपरेशनमध्ये अडथळे येत होते.

6- ओडिशा सरकारने हेल्पलाइन 06782-262286 जारी केली आहे. 033-26382217 (हावडा), 8972073925 (खड़गपूर), 8249591559 (बालासोर) आणि 044- 25330952 (चेन्नई) या रेल्वे हेल्पलाइन आहेत.

7- अपघातानंतर या रेल्वे मार्गावरील गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली. अपघातानंतर सियालदह पुरी दुरांतो एक्सप्रेससह 18 गाड्या रद्द करण्यात आल्या.

8- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मी बालासोर येथील घटनास्थळी पोहोचलो आहे. भुवनेश्वर आणि कोलकाता येथून बचाव पथके पाठवण्यात आली आहेत.

बचावकार्यात हवाई दल आणि इतर पथकेही तैनात आहेत. तसेच पीडित आणि जखमींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. पीएमओकडूनही मदत जाहीर करण्यात आली आहे.

9- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सांगितले की, मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत त्या परिस्थितीवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहोत. बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, पश्चिम बंगाल सरकार ओडिशा सरकार आणि दक्षिण पूर्व रेल्वेशी समन्वय साधत आहे.

10- तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. ट्रेन रुळावरून घसरल्यानंतर स्टॅलिन यांनी त्यांचे ओडिशा समकक्ष नवीन पटनाईक यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर ते म्हणाले की, आम्ही चार सदस्यीय पॅनेलची स्थापना केली आहे.

Odisha Train Accident
Odisha Train Accident: पीएम मोदी बालासोरला रवाना, ट्रेन अपघातात जखमी झालेल्यांची घेणार भेट

अपघाताला जबाबदार कोण?

मात्र, हा रेल्वे अपघात कसा झाला, याला जबाबदार कोण, हे तपासानंतरच कळेल. मात्र या बोगींची अवस्था पाहता त्यावेळी किती भीषण अपघात झाला असावा याचा अंदाज लावता जात आहे.

काही सेकंदातच रेल्वेच्या धडकेत अनेकांचा प्रवास अपूर्ण राहिला आणि अनेकांचे सर्वस्व गमावल्याचे स्पष्ट झाले. बालासोरमध्ये घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरु आहे. अडकलेल्यांचा शोध सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com