Umpire Hit by Ball: LIVE सामन्यात मोठी दुर्घटना; फलंदाजाचा पॉवरफुल शाॅट अन् चेंडू थेट अम्पायरच्या गालावर! धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Lakshay Thareja Shot Umpire: दिल्ली प्रीमियर लीग 2026 मधील एका सामन्यात अचानक घडलेल्या धक्कादायक घटनेने मैदानावरील वातावरण काही क्षणांसाठी तणावपूर्ण झाले.
Powerful cricket shot hits Umpire face
Umpire hit in the face by powerful cricket shot during live matchDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्ली प्रीमियर लीग 2026 मधील एका सामन्यात अचानक घडलेल्या धक्कादायक घटनेने मैदानावरील वातावरण काही क्षणांसाठी तणावपूर्ण झाले. ईस्ट दिल्ली रायडर्स आणि न्यू दिल्ली टायगर्स यांच्यातील सामन्यात फलंदाजाने मारलेला जोरदार फटका थेट अंपायरच्या चेहऱ्यावर जाऊन आदळला. चेंडू अंपायरच्या गालावर लागल्याने मोठी दुखापत टळली. मात्र, ही घटना पाहून खेळाडूंसह मैदानावरील सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.

वेगवान फटका अन् अचानक अंपायरच्या दिशेने गेला चेंडू

सामन्याच्या 30व्या लढतीत न्यू दिल्ली टायगर्सकडून लक्ष्य थरेजा फलंदाजी करत होता. डावखुरा फिरकीपटू आशीष मीणा गोलंदाजी करत असताना लक्ष्यने पुढे येत जोरदार फटका खेळला. चेंडू वेगाने पुढे जात असतानाच तो गोलंदाजाच्या हाताला लागला आणि त्यानंतर त्याचा मार्ग बदलून थेट अंपायरच्या चेहऱ्याच्या दिशेने गेला.

अंपायरला चेंडू टाळण्याची फारशी संधी मिळाली नाही. काही क्षणांतच चेंडू त्यांच्या गालावर जाऊन आदळला. अचानक झालेल्या या घटनेमुळे फलंदाज लक्ष्यही घाबरला आणि त्याने डोक्यावर हात ठेवत अंपायरच्या दिशेने पाहिले.

Powerful cricket shot hits Umpire face
Goa Bribery Case: 19 वर्षांपूर्वीच्या लाचप्रकरणी सरकार सर्वोच्च न्यायालयात; संध्या गुप्ता, राजेश वारंग यांना नोटीस

अंपायरला तातडीने मदत

चेंडू लागल्यानंतर अंपायरने तातडीने मदतीचा इशारा केला. मैदानावरील खेळाडू आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. सुदैवाने चेंडू गालावर लागल्यामुळे गंभीर जखम किंवा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला नाही. मात्र, खबरदारी म्हणून पुढील सामन्यासाठी अंपायरमध्ये बदल करण्यात आला.

या घटनेमुळे क्रिकेटमध्ये अंपायरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. फलंदाजांच्या फटक्यांचा वेग प्रचंड असतो आणि अंपायर अनेकदा फलंदाजाच्या अगदी जवळच्या भागात उभे असतात. त्यामुळे काही स्पर्धांमध्ये अंपायर हेल्मेट किंवा इतर सुरक्षात्मक साधनांचा वापर करताना दिसतात.

क्रिकेटमध्ये अंपायरला चेंडू लागण्याच्या गंभीर घटना

क्रिकेटच्या इतिहासात अंपायरला चेंडू लागून गंभीर दुखापत झाल्याच्या काही घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे मैदानावरील अधिकाऱ्यांची सुरक्षितता हा केवळ औपचारिक मुद्दा नसून अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो.

2019 मध्ये वेल्समधील एका स्थानिक सामन्यात अंपायरला डोक्यावर चेंडू लागल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. उपचारादरम्यान त्यांना कोमात जावे लागले आणि काही काळानंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला होता.

याआधीही अंपायरच्या मृत्यूच्या घटना

2014 मध्ये इस्रायलमध्ये झालेल्या एका लीग सामन्यात माजी क्रिकेटपटू आणि अंपायर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला फलंदाजाच्या फटक्याचा फटका बसला होता. चेंडू स्टंपला लागून अनपेक्षितपणे त्यांच्या दिशेने गेल्याचे सांगितले जाते. गंभीर दुखापतीनंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

2009 मध्ये वेल्समध्येही अशीच दुर्दैवी घटना घडली होती. स्थानिक लीग सामन्यात अंपायरिंग करत असताना फील्डरने केलेला जोरदार थ्रो त्यांच्या डोक्यावर जाऊन आदळला. ते मैदानावरच बेशुद्ध झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Powerful cricket shot hits Umpire face
Goa Politics: भाजप-कॉंग्रेस कार्यकर्ते भिडले, दाबोळीवर खर्गेंविरोधात घोषणाबाजी; पोलिसांची मध्यस्थी

DPL मधील घटनेत मोठा अनर्थ टळला

दिल्ली प्रीमियर लीगमधील ताज्या घटनेत मात्र सुदैवाने अंपायरला गंभीर दुखापत झाली नाही. चेंडू चेहऱ्यावर लागल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, या घटनेने वेगवान क्रिकेटमध्ये अंपायर किती धोकादायक स्थितीत असतात, हे पुन्हा अधोरेखित केले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अंपायरांसाठी अधिक प्रभावी सुरक्षात्मक साधनांचा वापर करण्याची गरज असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com