Goa cricket: गोव्याच्या मदतीला 'बंगळूर'चा पाऊस

'आंध्रप्रदेश' वर्चस्व राखू पाहताना पावसामुळे सामना रद्द
Goa Cricket
Goa CricketDainik Gomantak

पणजी: बंगळूरमधील अवेळचा पाऊस शनिवारी गोव्याच्या मदतीस आला. विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आंध्रचा संघ वर्चस्व राखू पाहत असताना पावसामुळे सामना रद्द करावा लागला.

(Vijay Hazare Trophy Andhra Pradesh vs Goa cricket match canceled)

पावसामुळे खेळ थांबला तेव्हा आंध्रने 21 षटकांत 1 बाद 96 धावा केल्या होत्या, नंतर खेळ पुन्हा सुरु होऊ शकला नाही व दोन्ही संघांना प्रत्येकी दोन गुण विभागून देण्यात आले. हा सामना रद्द झाल्याने गोव्याचा संघ रविवारी बिहारविरुद्ध खेळेल.

Goa Cricket
PAK vs ENG Final: पाकिस्तान... क्रिकेटच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध 'धर्मयुद्ध'?

आंध्रला अभिषेक रेड्डी व अश्विन हेब्बर यांनी 43 धावांची सलामी दिली. दहाव्या षटकात फेलिक्स आलेमावने अभिषेकला यष्टिरक्षक एकनाथ केरकर याच्याकरवी झेलबाद केले. त्यानंतर अश्विन व कर्णधार के. एस. भारत यांनी दुसऱ्या विकेटसाठी 53 धावांची अभेद्य भागीदारी केली.

Goa Cricket
Sachin Tendulkar: ENG विरुद्धच्या दारुण पराभवानंतर क्रिकेटचा देव म्हणाला...

संक्षिप्त धावफलक : आंध्र : 21 षटकांत 1 बाद 96 (अभिषेक रेड्डी 21, अश्विन हेब्बर नाबाद 42, के. एस. भारत नाबाद 33, लक्षय गर्ग 5-0-10-0, अर्जुन तेंडुलकर 3-0-15-0, फेलिक्स आलेमाव 5-1-16-1, सुयश प्रभुदेसाई 2-0-19-0, दीपराज गावकर 3-0-16-0, मोहित रेडकर 2-0-14-0, दर्शन मिसाळ 1-0-6-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com