IPL 2022: ''प्लावर नही फायर हूं'', जोस बटलरने केली दिल्लीची दांडी गुल

आयपीएल 2022 (IPL-2022) मध्ये एक दिग्गज फलंदाज आपला जलवा दाखवत आहे.
Jos Buttler
Jos ButtlerDainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल 2022 (IPL-2022) मध्ये एक दिग्गज फलंदाज आपला जलवा दाखवत आहे. या फलंदाजाने आतापर्यंत केवळ सात डाव खेळले असून यामध्ये त्याने पाच डावांत 50 धावांचा टप्पा पार केला आहे. जोस बटलर (Jos Buttler) असे या फलंदाजाचे नाव आहे. बटलरने शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) आणखी एक दमदार खेळी खेळली. इंग्लंडच्या (England) या दिग्गज फलंदाजाने दिल्लीविरुद्ध शतक ठोकले, जे त्याचे या मोसमातील तिसरे शतक आहे. बटलरने 116 धावा करत दिल्लीच्या गोलंदाजीचा जबरदस्त समाचार घेतला. या डावात बटलरने केवळ 65 चेंडूंचा सामना केला आणि चार चौकारांसह नऊ षटकार ठोकले. दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात बटलरचा स्ट्राइक रेट 178.46 होता. या खेळीसह बटलरने ऑरेंज कॅपच्या (IPL Orange Cap) या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान मजबूत केले आहे.

Jos Buttler
IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या संघात फूट? त्यामुळे होतोय पराभव

दरम्यान, सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला हंगामाच्या शेवटी ऑरेंज कॅप दिली जाते. लीगच्या मध्यावरही ऑरेंज कपवरील दावेदार बदलत राहतात. ही कॅप यावेळी बटलरकडे आहे. आणि तो त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप पुढे आहे. या मोसमात आतापर्यंत बटलरने सात सामन्यांच्या सात डावांत 491 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने तीन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सरासरी 81.83 आणि स्ट्राइक रेट 161.83 आहे. या मोसमात 400 पार करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

शॉ ने घेतली गगनभरारी

दिल्लीचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यानेही या सामन्यात आपला जलवा दाखवला आहे. संघाला त्याने दमदार सुरुवात करुन दिली. त्याने राजस्थानविरुद्ध 27 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. यासह तो नवव्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने सात सामन्यांत 254 धावा केल्या आहेत. या मोसमात आतापर्यंत शॉ च्या बॅटमधून दोन अर्धशतके झळकली आहेत. विशेष म्हणजे तो आता दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये लोकेश राहुलने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे. या मोसमात शतक ठोकणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. बटलर आणि राहुल यांच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला आतापर्यंत शतक झळकावता आलेले नाही. राहुलने सात सामन्यांच्या सात डावात 265 धावा केल्या आहेत.

Jos Buttler
IPL 2022: CSK ला मोठा धक्का, चहरनंतर आणखी एक खेळाडू झाला जायबंदी

हे दोन फलंदाजही टॉप-5 मध्ये

बटलर, राहुल आणि शॉ यांच्याव्यतरिक्त चेन्नई सुपर किंग्जचा शिवम दुबे आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांच्यासह टॉप-5 मध्ये आणखी दोन फलंदाज आहेत. डू प्लेसिसने या मोसमात सात सामन्यांत 35.71 च्या सरासरीने 250 धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतके झाली आहेत. तो चौथ्या क्रमांकावर आहे. शिवम दुबे सात सामन्यांत 239 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. दुबेनेही आतापर्यंत एकूण दोन अर्धशतके झळकावली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com