VIDEO: स्टार बॉक्सर माईक टायसनला आला राग, फ्लाइटमध्ये प्रवाशाला मारला मुक्का

फ्लाइटमध्ये टायसन एका प्रवाशावर नाराज होऊन त्याला मारहाण करताना दिसत आहे.
Mike Tyson
Mike TysonTwitter
Published on
Updated on

अमेरिकेचा माजी स्टार बॉक्सर माइक टायसनचा (Mike Tyson) संतप्त व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये माईक टायसन एका प्रवाशाला फ्लाइट मध्ये मारहाण करताना दिसत आहे. माईक टायसन त्या प्रवाशाच्या तोंडावर ठोसे मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 55 वर्षीय टायसन नेहमीच त्याच्या रागीट स्वभावासाठी ओळखला जातो. याआधीही तो अनेक प्रसंगी आपल्या रागाचा ताबा गमावताना दिसला आहे. यावेळी फ्लाइटमध्ये टायसन एका प्रवाशावर नाराज होऊन त्याला मारहाण करताना दिसत आहे. हे प्रकरण 20 एप्रिलचे आहे.हा प्रवासी टायसनला वारंवार त्रास देत होता, म्हणून माइकला राग आला.

Mike Tyson
IPL 2022: CSK ला मोठा धक्का, चहरनंतर आणखी एक खेळाडू झाला जायबंदी

बॉक्सर माइक टायसन सॅन फ्रान्सिस्कोहून फ्लोरिडाला जेटब्लू विमानाने जात होते. यादरम्यान, फ्लाइटमध्ये टायसनच्या मागे सीटवर एक व्यक्ती बसला होता, जो वारंवार काही प्रश्न विचारत होता. अनेकदा नकार देऊनही त्या व्यक्तीने माईक टायसनशी बोलणे थांबवले नाही. टायसनला आधीच राग येत होता, एक व्यक्ती त्याच्या मोबाईलवरून या सगळ्याचा व्हिडिओ बनवत होता.

समजावूनही ऐकत नसल्याने केली मारहाण

वारंवार नकार देऊनही तो प्रवासी ऐकत नव्हता. तेव्हा टायसनचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर त्याने ठोसे मारले. प्रवाशाच्या चेहऱ्यावरून रक्तही वाहू लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. या प्रकरणी अद्याप अमेरिकन पोलिस किंवा माईक टायसन यांच्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

Mike Tyson
VIDEO: धोनी परफेक्ट मॅच फिनिशर! जडेजा झाला नतमस्तक, रायडूनेही जोडले हात

माईक टायसनवर बलात्काराचे आरोप

टायसनचा शेवटचा अधिकृत सामना जून 2005 मध्ये झाला होता आणि माजी हेवीवेट चॅम्पियनने 1996 पासून एकही विजेतेपद जिंकलेले नाही. याआधीही टायसनला अनेक प्रसंगी राग अनावर होतांना बघितले आहे. एकदा 1997 मध्ये एका सामन्यादरम्यान टायसनने रागाच्या भरात एक विचित्र कृत्य केले. त्याने विरोधी बॉक्सर इव्हेंडर होलीफिल्डचा कान कापला होता. माइक टायसनवर अमली पदार्थांचे सेवन आणि बलात्काराचे आरोप असल्याचेही सिद्ध झाले आहेत. यासाठी त्यांना तुरुंगातही जावे लागले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com