आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंज देत होता. अॅडम मिल्नेच्या जागी सीएसकेने (Chennai Super Kings) श्रीलंकेचा (Sri Lanka) युवा गोलंदाज मथीशा पाथिरानाचा समावेश केला आहे. तो 19 वर्षांचा उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आहे. पाथिरानाची गोलंदाजी लसिथ मलिंगासारखीच आहे. या गोलंदाजाची कृतीही मलिंगाप्रमाणेच आहे. त्यामुळे त्याला 'लिटिल मलिंगा' असेही म्हटले जाते. (Chennai Super Kings' Adam Milne has been ruled out of the IPL 2022)
दरम्यान, मथिशा पाथिराना 2020 आणि 2022 च्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाचा भाग होता. 2022 अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये त्याने चार सामन्यांत 27.28 च्या सरासरीने सात विकेट घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 6.16 होता. तसेच यॉर्कर ही त्याची खासियत आहे. पाथीराना 20 लाखांच्या मूळ किमतीत CSK चा भाग बनला आहे.
पाथीराना सीएसकेच्या रडारवर होता
पाथीरानाने अद्याप वरिष्ठ स्तरावर सामने खेळलेले नाही. इथे त्याच्या नावावर एक लिस्ट ए आणि दोन टी-20 सामने आहेत. मात्र त्याला लिस्ट ए मध्ये एकही विकेट मिळालेली नाही, तर टी-20 मध्ये त्याला दोन विकेट मिळाल्या आहेत. 2021 च्या हंगामापूर्वी, सीएसकेने महिष तेक्षानासह पाथिरानाला राखीव खेळाडू म्हणून त्याच्यासोबत ठेवले होते.
केकेआरच्या सामन्यात मिल्नेला दुखापत झाली होती
अॅडम मिल्ने हा न्यूझीलंडचा (New Zealand) गोलंदाज आहे. IPL 2022 मध्ये त्याने पहिला सामना खेळला होता. KKR विरुद्धच्या सामन्यात CSK ने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले होते. मात्र यादरम्यान त्याला दुखापत झाली. अॅडम मिल्ने या सामन्यात केवळ 2.3 षटके टाकू शकला. यानंतर तो तीन आठवडे बाहेर असल्याची बातमी आली होती. परंतु आता तो आयपीएल 2022 मधून पूर्णपणे बाहेर पडला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.