Video: राशिद खानने आपले स्वप्न चाहत्यांसोबत शेयर केले

अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानने त्याचे सर्वात मोठे स्वप्न चाहत्यांसोबत शेयर केले आहे.
Rashid Khan
Rashid KhanDainik Gomantak

अफगाणिस्तानचा (Afghanistan) क्रिकेटर राशिद खानने (Rashid Khan) त्याचे सर्वात मोठे स्वप्न चाहत्यांसोबत शेयर केले आहे. गुजरात टायटन्सने आपल्या ट्विटरवर मिस्ट्री स्पिनर रशीदचा एक खास व्हिडिओ नेटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये राशिदने त्याचे सुरुवातीचे दिवस आठवले आहेत आणि क्रिकेटर बनण्याच्या त्याच्या प्रवासाबद्दलचा खुलासा केला आहे. रशीदने सांगितले की, बालपणात त्यााला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळाला नाहीये. माझ्या कुटुंबीयांनी मला क्रिकेटबाबत फारसा पाठिंबा दिलेला नाही. (Video Rashid Khan shares his dream with fans)

Rashid Khan
IPL 2022: हेटमायर करणार 'फायर' तर बुमराह ची चालणार जादूगिरी

पण 2009 किंवा 10 मध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा विश्वचषकात पदार्पण केले, तेव्हा तो आमच्यासाठी सर्वात मोठा आणि संस्मरणीय दिवस राहिला होता. अफगाणिस्तानच्या सर्व खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. रशीदने सांगितले की, जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळताना पाहिले तेव्हा आपल्या मुलाने काहीतरी केले आहे हे त्यांना त्यावेळी जाणवले. अफगाणिस्तानातील लोक घरी येऊन त्याचे अभिनंदन करायचे, त्यानंतर रशीदने काहीतरी वेगळे केल्याचे त्याच्या लक्षात आले. बाबर आझमने असा शॉट मारला, तेव्हा चेंडू थेट किचनमध्ये गेला होता असा व्हिडिओ शेयर केला आहे.

रशीदला गुजरातचा उपकर्णधार बनवल्याबद्दलही बोलले आणि तो म्हणाले की, आधी आशिष नेहराने त्याला सांगितले होते की, मला आधी वाटले की हा एक प्रकारचा विनोद आहे पण तो म्हणाला, नाही आम्हाला तू टीम मध्ये हवा आहेस, उपकर्णधार होण्यासाठी तू. जगभरातील लीग खेळल्या आहेत आणि तुला खूप अनुभव आहे. दीर्घकाळ तुझी आणि हार्दिकची जोडी संघासोबत राहून दोन्ही संघाला पुढे नेले पाहिजे.

Rashid Khan
महाराष्ट्रातील IPL चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन पाहता येणार मॅच

त्याचवेळी राशिदने त्याच्या सर्वात मोठ्या स्वप्नाचा खुलासा केला होता. देशासाठी विश्वचषक जिंकणे हे माझे सर्वात मोठे स्वप्न आहे, मी झोपण्यापूर्वी एकदा याचा नक्कीच विचार करतो, असं राशिद म्हणाला. रशीदने आपल्या आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत 94 विकेट घेतल्या आहेत, T20 मध्ये राशिदच्या नावावर 436 विकेट्स नोंदवल्या गेल्या आहेत.

गुजरातने 15 कोटी रुपये देऊन राशिदला त्याच्या टीमसोबत जोडले, तर यावेळी आयपीएलमध्ये (IPL) लखनऊ आणि टायटन्स हे दोन संघ आहेत जे यावेळी आयपीएल खेळणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com