Arshdeep Singh Video: अर्शदीपच्या बॉलिंगचा इंग्लंडमध्ये कहर! शतकवीर स्मिथचा वेगवान चेंडूने उडवला स्टंप

अर्शदीपने पहिल्याच काउंटी सामन्यात आपल्या गोलंदाजीने छाप पाडली आहे.
Arshdeep Singh
Arshdeep SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Arshdeep Singh Wicket: भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने रविवारी काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने केंट काउंटी संघाकडून सरेविरुद्धच्या सामन्यातून हे पदार्पण केले. दरम्यान, तो पदार्पणातच चमकला आहे. त्याने त्याच्या गोलंदाजीने प्रभाव पाडला आहे.

त्याने पहिल्याच डावात शानदार गोलंदाजी करताना 14.2 षटके गोलंदाजी करताना 43 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. यातील 4 षटके त्याने निर्धाव (मेडन) टाकली. त्याने या डावात सरेचा फलंदाज बेन फोक्सला सुंदर इनस्विंगर टाकत पायचीत केले होते.

ही त्याची काउंटी क्रिकेटमधली पहिली विकेटही ठरली. त्यानंतर त्याने डॅनिएल वॉरेलला 12 धावांवर बाद करत सरेचा डावही संपवला. सरेने पहिल्या डावात सर्वबाद 145 धावा केल्या.

Arshdeep Singh
जड्डूने ज्या बॅटने CSK ला IPL ट्रॉफी जिंकून दिली, त्याचं काय केलं, माहितीये का? तुम्हीही कराल कौतुक

अर्शदीपने दुसऱ्या डावातही शानदार गोलंदाजी करत केंटला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. दुसऱ्या डावात केंटने सरेसमोर 501 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना सरेकडून दमदार खेळ करणाऱ्या जेमी स्मिथला अर्शदीपने त्रिफळाचीत करत केंटला मोठा दिलासा दिला.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी स्मिथने आक्रमक शतकी खेळी केली होती. पण तो 114 धावांवर अशताना अर्शदीपने त्याचा बचाव भेदत स्टंपच उडवला. त्यामुळे स्मिथला माघारी परतावे लागले. पण त्याच्या शतकामुळे सरेने तिसऱ्या दिवसाखेर 3 बाद 263 धावा करता आल्या.

दरम्यान, या सामन्यात केंटने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 301 धावा केल्या होत्या. त्यामुळे केंटने 156 धावांची मोठी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात केंटने सर्वबाद 344 धावा करत सरे समोर 501 धावांचे आव्हान ठेवले होते.

Arshdeep Singh
Team India मध्ये वाहणार बदलाचे वारे? वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 'या' IPL स्टार्सला मिळू शकते संधी

दरम्यान, केंटकडून खेळण्यासाठी भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडकडून प्रेरणा मिळाल्याचे अर्शदीपने सांगितले होते. त्याने सांगितले होते की राहुल द्रविडही केंटकडून खेळला आहे. त्याने या संघाच्या इतिहासाबद्दलही सांगितले. त्यातून त्याला या संघासाठी खेळण्याची प्रेरणा मिळाली.

अर्शदीपने मार्चमध्ये केंटबरोबर करार केला होता. त्याने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 7 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 25 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने भारताकडून 26 टी20 आणि 3 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 41 आंतरराष्ट्रीय टी20 विकेट्स घेतल्या आहेत, तर वनडेत त्याला एकही विकेट घेता आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com