Women Cricket: विदर्भाच्या महिला गोव्याला भारी; नऊ विकेट राखून विदर्भचा एकतर्फी विजय

गोव्याचा हा पाच सामन्यांतील तिसरा पराभव
Ranji Cricket
Ranji Cricket Dainik Gomantak
Published on
Updated on

Women Cricket: सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात विदर्भाचा संघ सर्व बाबतींत भारी ठरल्यामुळे गोव्याला नऊ विकेट राखून एकतर्फी पराभव पत्करावा लागला. सामना शुक्रवारी गुवाहाटी येथील नेहरू स्टेडियमवर झाला.

Ranji Cricket
Goa Tourism Advisory: दारु, सेल्फी, टॅक्सीबाबत गोव्यातील नियम बदलले, 50,000 दंडाची तरतूद; जाणून घ्या नवे 'नियम'

गोव्याचा हा पाच सामन्यांतील तिसरा पराभव ठरला. त्यांनी अन्य दोन लढती जिंकल्या आहेत. गोव्याचे आठ गुण कायम राहिले असून बाद फेरीच्या आशांना धक्का बसला आहे. विदर्भाचा हा सहा सामन्यांतील पाचवा विजय असून त्यांचे ड गटात सर्वाधिक 20 गुण झाले आहेत.

विदर्भाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गोव्याचा डाव 32.4 षटकांत अवघ्या 70 धावांत आटोपला. नंतर विदर्भाने उपाहारानंतर लगेच 15.5 षटकांत 1 विकेट गमावून विजयासाठी आवश्यक 71 धावा नोंदविल्या. गोव्याच्या डावात श्रेया परब व कर्णधार सुनंदा येत्रेकर (प्रत्येकी 13) या दोघींनीच दुहेरी धावसंख्या गाठली.

Ranji Cricket
Mahadayi Water Dispute : म्हादईप्रकरणी पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी

संक्षिप्त धावफलक

गोवा : 32.4 षटकांत सर्वबाद 70 (पूर्वजा वेर्लेकर 4, तनया नाईक 1, तेजस्विनी दुर्गड 4, निकिता मळीक 5, संजुला नाईक 1, श्रेया परब 13, सुनंदा येत्रेकर 13, पूर्वा भाईडकर 4, दिव्या नाईक 6, दीक्षा गावडे नाबाद 4, मेताली गवंडर 7, कोमल झांझड 3-8, आर्या गोहाणे 2-27, कांचन नागवाणी 3-9) पराभूत

विदर्भ: 15.5 षटकांत 1 बाद 71 (वैष्णवी खांडकर नाबाद 34, डी. कसाट नाबाद 37, पूर्वा भाईडकर 5.5-0-29-1, मेताली गवंडर 1-0-8-0, सुनंदा येत्रेकर 3-2-9-0, तनया नाईक 2-0-2-0, दीक्षा गावडे 3-0-13-0, निकिता मळीक 1-0-10-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com