आधी गाड्या रेसिंग ट्रॅकवर आणि नंतर दिलगिरी व्यक्त

पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलातील (Pune Shivchatrapati Sports Complex) अ‍ॅथलीट्सच्या रेस ट्रॅकवर (Race Track) व्हीव्हीआयपी गाड्यांना पार्किंगची (VVIP Car Parking) परवानगी.
Pune Shivchatrapati Sports Complex, VVIP Car Parking
Pune Shivchatrapati Sports Complex, VVIP Car ParkingTwitter/ @ANI
Published on
Updated on

पुणे: पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलातील (Pune Shivchatrapati Sports Complex) अ‍ॅथलेटीक्सच्या रेस ट्रॅकवर (Race Track) व्हीव्हीआयपी गाड्यांच्या पार्किंगबाबत (VVIP Car Parking) महाराष्ट्र चर्चेला उधाण आले आहे. या संदर्भात क्रीडा आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पायाला दुखापत झाली आहे, म्हणूनच त्यांच्या कारला ट्रॅकवर पार्क करण्याची परवानगी देण्यात आली होती. जेणेकरून त्यांना जास्त चालावे लागणार नाही. (Vehicles were allowed to be parked on Race tracks as Sharad Pawar had an issue with his leg)

महाराष्ट्र क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी एएनआयला सांगितले की, नाइलाजास्तव वाहने रेस ट्रॅकवर उभी केली गेली आहे. याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Pune Shivchatrapati Sports Complex, VVIP Car Parking
WTC Final : पराभवानंतर भारतीय संघाचे निवडकर्ते इंग्लंड - श्रीलंकेत जाणार

शरद पवारांच्या गाडीलाच परवानगी कशा?

स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रेस ट्रॅकवर उभ्या केलेल्या व्हीव्हीआयपी गाड्यांबाबत बोलताना भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रेस ट्रॅकवर वाहने पार्क करून क्रीडा पायाभूत सुविधांचे नुकसान केले आहे. याबाबत त्यांनी माफी मागावी त्याचबरोबर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.

Pune Shivchatrapati Sports Complex, VVIP Car Parking
पेडण्यातील बुद्धिबळात लढतीपूर्वीच ‘माघार’

रेस ट्रॅकवर उभ्या केलेल्या व्हीव्हीआयपी गाड्या

ट्रॅकवर उभ्या केलेल्या व्हीव्हीआयपी गाड्या 26 जूनला आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठा अंतर्गत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान शरद पवार, क्रीडामंत्री सुनील केदार, आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या नेत्यांनी त्यांच्या गाड्या अ‍ॅथलेटीक्सच्या ट्रॅकवर उभ्या केल्या याबाबत केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे, ते म्हणाले, "देशात क्रीडा सुविधांचा अभाव आहे. सर्व क्रीडा संकुलांना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पुणे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे." असे क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com