VIDEO: 97 रन्सवर विकेट गेली अन्...; वैभव सूर्यवंशीचा संयम सुटला; मैदानातच दिली शिवी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

vaibhav suryavanshi dismissed on 97 runs video: आयपीएल २०२६ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला.
Vaibhav Sooryavanshi viral video
Vaibhav Sooryavanshi viral videoDainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल २०२६ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला. राजस्थानच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो अवघ्या १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी! त्याने आपल्या वादळी फलंदाजीने हैदराबादच्या गोलंदाजांना पाणी पाजले. मात्र, एवढी उत्कृष्ट कामगिरी करूनही बाद झाल्यानंतर मैदानातून बाहेर जाताना वैभवच्या चेहऱ्यावरील निराशा आणि राग सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. बाद झाल्यानंतरचा त्याचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून त्यावरून चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे.

अवघ्या २९ चेंडूंत ९७ धावा कुटल्या, पण शतकाची हुलकावणी

या अटीतटीच्या नॉकआउट सामन्यात वैभव सूर्यवंशीने चौफेर फटकेबाजी करत केवळ २९ चेंडूंमध्ये ९७ धावांची ऐतिहासिक खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल १२ षटकार आणि ५ चौकार ठोकले. मात्र, शतकापासून अवघ्या ३ धावा दूर असताना तो बाद झाला. याच निराशेपोटी पॅव्हेलियनमध्ये परतत असताना वैभव स्वतःशीच काहीतरी बोलताना दिसला.

त्याच्या चेहऱ्यावर शतक हुकल्याचा राग स्पष्टपणे जाणवत होता. सोशल मीडियावरील काही युजर्सचा असा दावा आहे की, रागाच्या भरात वैभव स्वतःलाच शिवी देत होता. परंतु, या व्हायरल व्हिडिओला ऑडिओ (आवाज) नसल्यामुळे, तो खरंच शिवी देत होता की फक्त स्वतःवरच चिडला होता, याबाबत चाहत्यांमध्ये दोन गट पडले आहेत.

Vaibhav Sooryavanshi viral video
Goa Resort Drowning: जलतरण तलावात बुडून पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू; 'ओल्ड अँकर रिसॉर्ट'मध्ये दुर्दैवी घटना

एलिमिनेटर सामन्यात मोडले अनेक विक्रम

नॉकआउट सामन्यांमध्ये मोठ्या अनुभवी खेळाडूंवरही प्रचंड दडपण असते, पण १५ वर्षांच्या या नवख्या खेळाडूने ३३४.४८ च्या अद्भूत स्ट्राइक रेटने धावा कुटल्या. त्याने अवघ्या १६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे आयपीएलच्या इतिहासातील प्लेऑफमधील संयुक्तपणे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. त्याच्या या तुफानी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादवर ४७ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि क्वालिफायर-२ मध्ये आपले स्थान पक्के केले.

Vaibhav Sooryavanshi viral video
Goa Truck Crash: चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी! साकोर्डा येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

इतिहास रचण्यापासून अवघ्या २० धावा दूर!

वैभव सूर्यवंशीसाठी हा आयपीएलचा मोसम स्वप्नवत ठरला असून तो सातत्याने नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. सध्या तो ६८० धावांसह 'ऑरेंज कॅप'च्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. आता सर्वांचे लक्ष क्वालिफायर-२ सामन्याकडे लागले आहे. या आगामी सामन्यात वैभवने आणखी २० धावा केल्या, तर आयपीएलच्या एकाच मोसमात ७०० धावा पूर्ण करणारा तो इतिहासातील पहिला 'अनकॅप्ड' (आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला) फलंदाज ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com