Goa Resort Drowning: जलतरण तलावात बुडून पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू; 'ओल्ड अँकर रिसॉर्ट'मध्ये दुर्दैवी घटना

Pune Tourist Death : ‘जीवाचा गोवा’ करण्यासाठी पुण्याहून गोव्यात आलेल्या एका ४१ वर्षीय पर्यटकाचा दक्षिण गोव्यातील मोबोर येथील एका रिसॉर्टमधील जलतरण तलावात पोहत असताना बुडून मृत्यू
Pune tourist dies in Goa resort
Pune tourist dies in Goa resortDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: ‘जीवाचा गोवा’ करण्यासाठी पुण्याहून गोव्यात आलेल्या एका ४१ वर्षीय पर्यटकाचा दक्षिण गोव्यातील मोबोर येथील एका रिसॉर्टमधील जलतरण तलावात पोहत असताना बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली. २५ मे रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास महेश पवार यांनी कोलवा पोलिसांना माहिती दिली की, त्यांचा चिंचवड नगर, पुणे येथील मित्र योगेश सोनवणे हा मोबोर-केळशी येथील ‘ओल्ड अँकर रिसॉर्ट’च्या जलतरण तलावात पोहत असताना बुडाला.

माहिती मिळताच कोलवा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी योगेश सोनवणे याला तातडीने बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.प्राथमिक माहितीनुसार, योगेश सोनवणे हे मित्रांसोबत गोव्यात पर्यटनासाठी आले होते. पोहत असताना नेमके काय घडले, त्यांना अचानक त्रास झाला का किंवा अन्य काही कारण होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Pune tourist dies in Goa resort
Ketan Bhatikar Death: भाटीकरांच्‍या मृत्‍यूचा कर्नाटक पोलिसांकडून तपास सुरू; मिकी पाशेकोंच्‍या तक्रारीची दखल; कोर्टात जाण्‍याचीही काहींची तयारी

दरम्यान, पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात अंतिम विधीसाठी देण्यात आला. याप्रकरणी कोलवा पोलिस स्थानकात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोलवा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक मंजू वंतामुरी पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com