Vaibhav Sooryavanshi: 'हलक्यात घेऊ नका...' 18 चेंडूत अर्धशतक झळकावताच वैभव सूर्यवंशीचा इशारा, चाहत्यांनाही दिला खास संदेश Watch Video

Vaibhav Sooryavanshi Youngest T20 Fifty Record: भारतीय क्रिकेटचा उगवता तारा वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे.
Vaibhav Sooryavanshi Youngest T20 Fifty Record
Vaibhav Sooryavanshi Dainik Gomantak
Published on
Updated on

Vaibhav Sooryavanshi Youngest T20 Fifty Record: भारतीय क्रिकेटचा उगवता तारा वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे. जिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वैभवने अवघ्या 18 चेंडूंत खणखणीत अर्धशतक ठोकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या आक्रमक आणि वादळी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने जिम्बाब्वेने दिलेले आव्हान अवघ्या 13.2 षटकांत लीलया पार करत दणदणीत विजय मिळवला.

अवघ्या 15 वर्षे 118 दिवस वयात हे अर्धशतक झळकावून वैभव टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात अर्धशतक ठोकणारा जगातील सर्वात युवा फलंदाज ठरला. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर होता, ज्याने 1996 मध्ये 16 वर्षे 214 दिवस वयात अर्धशतक केले होते.

Vaibhav Sooryavanshi Youngest T20 Fifty Record
Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांच्या स्टार भारतीय क्रिकेटरचा पाकिस्तानात 'जलवा'! गुगल ट्रेंड्समध्ये वैभव सूर्यवंशी अव्वल; आफ्रिदीशी होतेय तुलना

सामन्यानंतर बीसीसीआयने (BCCI) वैभव सूर्यवंशीचा एक विशेष मुलाखतीचा व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओमध्ये बोलताना वैभवने आपल्या या ऐतिहासिक कामगिरीचे श्रेय कुटुंब, प्रशिक्षक आणि चाहत्यांना दिले. तो म्हणाला की, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच अशी धमाकेदार खेळी खेळायला मिळाल्याने आत्मविश्वास कमालीचा वाढतो. मैदानावर उतरल्यावर आपण आपल्या नैसर्गिक शैलीनुसार आणि क्षमतेनुसार खेळण्याचा प्रयत्न केला. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मैदानावर केलेले सेलिब्रेशन हे विशेषतः आपल्या आईसाठी होते, असा भावनिक खुलासाही त्याने केला. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही काळात पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या प्रत्येकासाठी ही खेळी समर्पित असल्याचे त्याने नमूद केले.

Vaibhav Sooryavanshi Youngest T20 Fifty Record
Sachin Tendulkar On Vaibhav Sooryavanshi: 'घाई करू नका...' 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या टेस्ट डेब्युबाबत सचिन तेंडुलकर असं का म्हणाला?

विशेष म्हणजे हरारेचे मैदान वैभव सूर्यवंशीसाठी अत्यंत लकी ठरत आहे. याआधी याच मैदानावर त्याने अंडर-19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात 175 धावांची अतिशय तुफानी खेळी खेळली होती. हरारेच्या मैदानातील वातावरणाबद्दल बोलताना तो म्हणाला की, काही मैदाने अशी असतात जिथे फलंदाजी करताना एक वेगळाच उत्साह आणि आत्मविश्वास असतो. मात्र, मिळालेल्या यशाने हुरळून न जाता किंवा कोणतीही गोष्ट हलक्यात न घेता, आगामी प्रत्येक सामन्यात संघाच्या विजयासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा आपला प्रयत्न राहील, असा परिपक्व विचारही त्याने मांडला. वैभवच्या या विक्रमी आणि धडाकेबाज कामगिरीमुळे जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com