VIDEO: विजेतेपदाचं स्वप्न भंगलं अन्...; राजस्थान रॉयल्सच्या एक्झिटनंतर वैभव सूर्यवंशी ढसाढसा रडला; डगआऊटमधील व्हिडिओ व्हायरल

Vaibhav Suryavanshi Crying Post Match: वैभवने आपल्या अप्रतिम फलंदाजीने कोणालाही निराश केले नाही. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 15व्या वर्षी 96 धावांची वादळी खेळी खेळली.
Vaibhav Suryavanshi Crying Post Match
Vaibhav Suryavanshi CryingDainik Gomantak
Published on
Updated on

Vaibhav Suryavanshi Crying Post Match: आयपीएल 2026 च्या 19व्या हंगामात रियान परागच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचा प्रवास दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातील पराभवासह संपला. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सर्वांचे लक्ष राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या कामगिरीकडे लागले होते.

वैभवने आपल्या अप्रतिम फलंदाजीने कोणालाही निराश केले नाही. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 15व्या वर्षी 96 धावांची वादळी खेळी खेळली. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर राजस्थानने 214 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, इतकी मोठी धावसंख्या उभारुनही राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यांचे फायनल गाठण्याचे स्वप्न भंगले.

Vaibhav Suryavanshi Crying Post Match
GT vs RR IPL 2026 Qualifier 2: गुजरात की राजस्थान? पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कुणाला? पाहा काय सांगतो IPL चा नियम

या पराभवानंतर अवघ्या 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी कमालीचा निराश झालेला पाहायला मिळाला. सामना संपल्यानंतर मैदानावरच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राजस्थानचा पराभव झाल्यानंतर दिग्गज खेळाडू रवींद्र जडेजाने मैदानात वैभव जवळ जाऊन त्याचे सांत्वन केले आणि त्याच्याशी काही वेळ चर्चा केली. त्यानंतर स्वतःचे अश्रू आणि निराशा लपवण्यासाठी वैभवने कॅपने आपले तोंड झाकले आणि तो डगआऊटमध्ये जाऊन एकटाच बसला.

डगआऊटमध्ये बसलेले असताना जेव्हा त्याच्या डोळ्यातून पुन्हा पाणी आले, तेव्हा त्याने तात्काळ रुमालाने तोंड झाकून मान खाली घातली. काही वेळानंतर त्याने स्वतःला सावरले आणि तो डगआऊटमधून बाहेर आला. सामन्यानंतर तो गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याच्याशीही चर्चा करताना दिसला.

Vaibhav Suryavanshi Crying Post Match
IPL Qualifier 1 Bengaluru vs Gujarat: गुजरातचं टेन्शन वाढलं! क्वालिफायर-1 पूर्वी RCB च्या संघात 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्री; बंगळुरूला मोठा दिलासा

पराभवामुळे वैभव जरी भावूक झाला असला, तरी आयपीएल 2026च्या या संपूर्ण हंगामात त्याने आपल्या बॅटने अनेक मोठे विक्रम मोडित काढले. आयपीएलच्या (IPL) इतिहासात यापूर्वी कोणत्याही फलंदाजाला एकाच हंगामात असे विक्रम करता आले नव्हते. वैभवने या हंगामात खेळलेल्या 16 सामन्यांमध्ये 48.50 च्या उत्कृष्ट सरासरीने तब्बल 776 धावा कुटल्या. या धावा करताना त्याने 63 चौकार आणि तब्बल 72 गगनचुंबी षटकार ठोकले.

Vaibhav Suryavanshi Crying Post Match
IPL Playoff Equation: आयपीएलमध्ये नवा ट्विस्ट! राजस्थानचा रस्ता खडतर; पंजाब किंग्ज आणि केकेआरच्या प्लेऑफच्या आशा 'मुंबई'च्या हाती

आयपीएलच्या कोणत्याही एका हंगामात एखाद्या फलंदाजाने ठोकलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. याशिवाय, आयपीएलच्या एकाच हंगामात पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करताना 500 हून अधिक धावांचा टप्पा ओलांडणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. वैयक्तिक पातळीवर वैभवने इतिहास रचला असला, तरी संघाला अंतिम फेरीत न पोहोचवता आल्याचे दुःख या युवा खेळाडूच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com