US Open 2022: नोव्हाक जोकोविच यूएस ओपन 2022 मधून आऊट

Novak Djokovic: सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच यावेळी यूएस ओपन 2022 मध्ये खेळू शकणार नाही.
Novak Djokovic
Novak DjokovicDainik Gomantak

Novak Djokovic: सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच यावेळी यूएस ओपन 2022 मध्ये खेळू शकणार नाही. स्पर्धा आधीच सुरु झाली आहे, परंतु नोव्हाक अमेरिकेला जाऊ शकणार नाही. कोरोनाची लस न घेतल्याने तो यावेळी यूएस ओपनमध्ये सहभागी होणार नाही. या वर्षी तो ऑस्ट्रेलियन ओपनही खेळू शकला नाही. जोकोविचने सांगितले की, 'यूएस ओपनसाठी आपण यावेळी न्यूयॉर्कला जाऊ शकणार नाही.'

दरम्यान, 21 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic) ट्विट करत म्हटले की, "यावेळी मी यूएस ओपनसाठी न्यूयॉर्कला (New York) जाऊ शकणार नाही. माझ्या सहकारी खेळाडूंना शुभेच्छा! चांगल्या स्थितीत आणि सकारात्मक भावनेत राहा. लवकरच भेटू... टेनिस (Tennis) वर्ल्ड!"

Novak Djokovic
Swiss Open 2022 : पीव्ही सिंधूने अंतिम फेरीत पटकावले विजेतेपद

मात्र, कोरोना लस न घेतल्यामुळे त्याला यूएस ओपनमधून बाहेर पडावे लागल्याचे त्याने आपल्या ट्विटमध्ये नमूद केलेले नाही. मात्र लसीकरणामुळे (Vaccination) तो या स्पर्धेतून बाहेर पडला असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, यूएसएचा नियम आहे की, जो कोणी विमानाने प्रवास करतो, त्याने लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र नोव्हाक जोकोविचने ही लस घेतलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com