U-17 WC: बलाढ्य फ्रान्सला नमवत टांझानियाचा ऐतिहासिक विजय

फ्रान्सला धक्का: 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडकात प्रथमच पूर्ण गुण
world cup tournament
world cup tournament Dainik Gomantak

पणजी: पूर्व आफ्रिकेतील टांझानिया देश पुरुषांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत कधीच खेळलेला नाही, मात्र त्यांच्या 17 वर्षांखालील महिला संघाने शनिवारी गोव्यातील फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर इतिहास रचला. या वयोगटातील महिला विश्वकरंडक स्पर्धेत प्रथमच विजय नोंदविताना बलाढ्य फ्रान्सला 2-1 असा पराभवाचा जबर धक्का दिला.

(Under-17 Women's world cup tournament Tanzania team registered first victory)

world cup tournament
T20 World Cup: सावधान टीम इंडिया! हे 4 खेळाडू जेतेपदापासून ठेऊ शकतात दूर

फ्रान्स 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडकातील माजी विजेता संघ आहे. त्यांनी 2012 साली ही स्पर्धा जिंकली होती. मात्र शनिवारी ‘ड’ गटात टांझानियाच्या नियोजनबद्ध खेळासमोर फ्रेंच खेळाडू गडबडले. आफ्रिकन देशासाठी हा विजय नाट्यमय ठरला.

पूर्वार्धापूर्वी त्यांनी एक पेनल्टी फटकाही वाया घालविला, तर सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना रेड कार्डमुळे दहा खेळाडूंशी खेळावे लागले. फ्रान्सने बरोबरीसाठी कसोशीने प्रयत्न केले, परंतु इंज्युरी टाईममधील नऊ मिनिटांच्या खेळात एक खेळाडू कमी असूनही टांझानियाने यशस्वीपणे किल्ला लढविला. ते या सामन्यात 4-5-1 व्यूहरचनेत खेळले.

world cup tournament
'#ArestKohli', ट्विटरवर कोहलीच्या अटकेची का होतेय मागणी, वाचा संपूर्ण प्रकरण

पराभवामुळे फ्रान्सच्या उपांत्यपूर्व फेरीतील आशांना धक्का बसला. पहिल्या फेरीत त्यांना कॅनडाने 1-1 असे बरोबरीत रोखले. त्यामुळे एक गुण कायम राहिला. फ्रान्सचा पुढील सामना 18 ऑक्टोबरला जपानविरुद्ध गोव्यातच होईल.

टांझानियाला पहिल्या लढतीत जपानकडून चार गोलने एकतर्फी हार पत्करावी लागली होती. शनिवारच्या विजयामुळे त्यांचे तीन गुण झाले आहेत. शिमे बाकारी यांच्या मार्गदर्शनाखालील साखळी फेरीतील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध 18 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथे खेळला जाईल.

विश्वकरंडकातील पहिला गोल

टांझानियातर्फे विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीत पहिला गोल नोंदविण्याचा मान डायना म्नाल्ली हिने मिळविला. सेटपिसेसवर हा गोल झाला. सामन्याच्या 17 व्या मिनिटास कॉर्नर फटक्यावर बचावपटू असलेल्या डायना हिने चेंडूला अचूक दिशा दाखविताना प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकवा दिला.

विश्रांतीला सात मिनिटे बाकी असताना टांझानियाला पेनल्टी फटका मिळाला, पण त्यांच्या खेळाडूने फटका गोलपट्टीवरून मारल्यामुळे आफ्रिकन संघाने सुवर्णसंधी गमावली. यावेळी पेनल्टी फटक्यासाठी रेफरीने ‘व्हीएआर’ तंत्रज्ञानाची मदत घेतली.

उत्तरार्धात टांझानियाला पुन्हा पेनल्टी फटका मिळाला. 60 व्या मिनिटास ख्रिस्तर बाहेरा हिने एकाग्रपणे पेनल्टी फटका मारत संघाची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. 77 व्या मिनिटास ल्युसी काल्बा हिने फ्रान्सची पिछाडी कमी केली, परंतु नंतर टांझानियाचा बचाव भेदणे युरोपीय संघाला जमले नाही. 89 व्या मिनिटास लेमा जॉयसी हिला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे मैदान सोडावे लागले आणि टांझानिया संघातील एक खेळाडू कमी झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com