'#ArestKohli', ट्विटरवर कोहलीच्या अटकेची का होतेय मागणी, वाचा संपूर्ण प्रकरण

Arrest Virat Kohli Trend On Twitter: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो.
Virat kohli
Virat kohliDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli Trend On Twitter: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. टीम इंडियासाठी त्याने अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी तो सध्या ऑस्ट्रेलियात आहे. दरम्यान, विराट कोहलीच्या अटकेची मागणी करत सोशल मीडियावर लोकांनी #ArrestKohli सुरु केले आहे. जाणून घेऊया, काय आहे हे संपूर्ण प्रकरण.

ही मोठी मागणी चाहत्यांनी लावून धरली

अचानक ट्विटरवर 'अरेस्ट विराट कोहली (Virat kohli)' ट्रेंड करु लागले. वास्तविक हा वाद तामिळनाडूमधील पी विघ्नेश आणि एस धर्मराज या दोन मित्रांमध्ये झाला होता. पी विघ्नेश रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) चा चाहता होता. तर आरोपी एस. धर्मराज हा विराट कोहलीचा चाहता होता. यातच विग्रेशने आरसीबीला बरे वाईट म्हटले. यावरुन विराट कोहलीचा चाहता असणाऱ्या धर्मराज याने विघ्नेशच्या डोक्यात बॅट मारली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Virat kohli
Virat Kohli ने मोडला 'The Wall' चा रेकॉर्ड; ठरला दुसरा भारतीय खेळाडू

चाहते सोशल मीडियावर आमने-सामने

तामिळनाडूतील (Tamil Nadu) घटनेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे चाहते सोशल मीडियावर आमने-सामने आले. त्यानंतर ट्विटरवर विराट कोहलीविरोधात #ArestKohli ट्रेंड होऊ लागले. त्याचबरोबर रोहितचे चाहते कोहलीच्या आक्रमकतेवरही टीका करत आहे. जो की विराट कोहलीचा तामिळनाडूतील घटनेशी काहीही संबंध नाही.

Virat kohli
Virat Kohli करणार आज हा महारेकॉर्ड! कोणत्याही भारतीय फलंदाजाला...

स्फोटक फलंदाजीत निपुण

विराट कोहली त्याच्या स्फोटक फलंदाजीत तरबेज आहे. त्याने भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक सामने खेळले आहेत. टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरणार तो सर्वात विश्वासार्ह फलंदाज आहे. जेव्हा तो आपल्या लयीत असतो तेव्हा, तो शानदार प्रदर्शन करतो. त्याने भारतासाठी 102 कसोटी, 254 एकदिवसीय आणि 105 टी-20 सामने खेळले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com