IPL 2022: श्रेयस अय्यरने टॉस जिंकत मारली बाजी, जाणून घ्या Playing 11

मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर नव्या मोसमातील पहिल्या सामन्याचे नाणे झेपावले असून इथे कोलकाताने बाजी मारली आहे.
CSK vs KKR
CSK vs KKRDainik Gomantak
Published on
Updated on

अखेर प्रतीक्षा संपली... इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) सुरु झाली आहे. गेल्या मोसमात, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) मधील दोन्ही अंतिम फेरीतील खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर आमनेसामने आले आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नव्या मोसमातील पहिल्या सामन्याचे नाणे झेपावले असून इथे कोलकाताने बाजी मारली आहे. कोलकाताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही चॅम्पियन संघ आता नव्या कर्णधारांसह मैदानात उतरले आहेत. एमएस धोनीने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयानंतर रवींद्र जडेजाकडे ही कमान सोपवली आहे. त्याचबरोबर कोलकात्याची कमान श्रेयस अय्यरच्या हाती आहे.

CSK vs KKR
IPL 2022 : एन्ट्री आधीच बिहार संघाच्या नावाची चर्चा; भन्नाट मीम्स होतायेत व्हायरल

दरम्यान, नाणेफेक जिंकून श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 'खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असून रात्रीच्या दव प्रभावामुळे लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे होईल,' असे अय्यरने यावेळी सांगितले. भारताचा वरिष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणे आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज सॅम बिलिंग्स केकेआरकडून पदार्पण करत आहेत. तर दुसरीकडे, न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेव्हॉन कॉनवे, वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिल्ने, भारतीय अष्टपैलू शिवम दुबे आणि युवा भारतीय वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे हे CSK कडून पदार्पण करत आहेत.

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल काही खास

जर प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाल्यास, या सामन्यासाठी कोलकाता संघात केवळ 3 विदेशी खेळाडू खेळत आहेत. आंद्रे रसेल आणि सुनील नरेन याच्याशिवाय सॅम बिलिंग्स आहे. विशेष म्हणजे, रहाणेला संघात व्यंकटेश अय्यरसह सलामीची जबाबदारी मिळाली आहे, तर भारताचा अनुभवी देशांतर्गत फलंदाज शेल्डन जॅक्सनवरही भरवसा ठेवण्यात आला आहे. पॅट कमिन्स आणि टीम साऊदीसारख्या दिग्गज वेगवान गोलंदाजांची कमतरताही भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव भरुन काढत आहे.

CSK vs KKR
CSK vs KKR, IPL 2022: केकेआरची यंग ब्रिगेड, सीएसकेच्या 'अनुभवा'वर पडणार का भारी

दुसरीकडे, चेन्नईबद्दल विचार करायचा झाल्यास, डेव्हॉन कॉनवे संघात सलामीला फाफ डू प्लेसिसची जागा घेणार आहे. त्याच्याशिवाय सीएसकेचे इतर तीन परदेशी खेळाडू ब्राव्हो, मिलने आणि सॅन्टनर आहेत. ऋतुराज, उथप्पा आणि रायुडू यांनी केलेल्या धावांवर संघाची फलंदाजी पुन्हा एकदा अवलंबून असेल.

CSK vs KKR: या दोघांपैकी 11 Playing 11

CSK - रवींद्र जडेजा (कर्णधार), ऋतुरत गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर, अ‍ॅडम मिल्ने

KKR - श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, सॅम बिलिंग्ज, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन, सुनील नरेन, शिवम मावी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com