Tokyo Olympics: सोर्ड मारजेन, भारताचा खरा खुरा कबीर खान

सोर्ड मारजेन, भारताचा खरा खुरा कबीर खान ज्याने महिला हॉकी संघाला दिली आहे एक वेगळी ओळख
Shah Rukh Khan (L) played a character named Kabir Khan in movie Chak De India. Sjoerd Marijne (R), coach of Indian women hockey team
Shah Rukh Khan (L) played a character named Kabir Khan in movie Chak De India. Sjoerd Marijne (R), coach of Indian women hockey teamTwitter
Published on
Updated on

चक दे इंडिया (Chak De India) म्हणत भारतीय महिला हॉकी संघाने (Indian women hockey team) सोमवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) इतिहास रचला आहे. भारतीय संघाने (Indian Women’s Hockey Team) ऑस्ट्रेलिया (Australia) सारख्या मोठ्या संघाचा पराभव करत उपांत्यफेरीत मजल मारली आहे.

Shah Rukh Khan (L) played a character named Kabir Khan in movie Chak De India. Sjoerd Marijne (R), coach of Indian women hockey team
Tokyo Olympics: भारताने जगजेत्ता ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

भारतीय महिला हॉकी संघावर या विजयानंतर सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आजचा सामना झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तर थेट शाहरुख खानच्याच्या चक दे इंडिया ची आठवण करून दिली. या चित्रपटात शाहरुख ने महिला संघाच्या व्यवस्थापकाची भूमिका केली होती. आज सामना झाल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाचा कोच सोर्ड मारजेनला विजयी अश्रू अनावर झाले आणि हे पाहूनच भारताचा खरा कबीर खान मिळाल्याचा आनंद लोकांनी साजरा केला. सोर्ड मारजेनची ४ वर्षांपूर्वी भारताच्या प्रशिक्षपदी निवड झाली होती. ४ वर्षांपूर्वी जो संघ ऑलिम्पिक मधून निराशेने परतला होता त्या संघावर मारजेनने मेहनत घेऊन या संघाला एक नवीन ओळख निर्माण करून दिली आहे.

ग्रुप स्टेज मध्ये भारताची सुरवात चांगली झाली नव्हती मात्र उपांत्यपूर्व फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली.

बलाढ्य संघ म्हुणुन ओळख असलेल्या ऑस्ट्रेलियाला हरवणे तितकेसे सोपे नव्हते. शेवटच्या मिनिटापर्यंत ऑस्ट्रेलियन महिला आक्रमक खेळ करत होत्या मात्र सविता पुनिया हिने गोल रक्षाच्या भूमिकेतुन उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीयाने हा विजय मिळवला. तिनी ऑस्ट्रेलियाच्या एकही खेळाडूला गोल मारण्याची एक ही संधी दिला नाही. तत्पूर्वी भारताकडून गुरजीत कौरने (Gurjeet Kaur) २२ व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी दिली आणि हाच गोल विजयासाठी पूरक ठरला.

आता भारतीय महिला हॉकी संघाचा सामना सेमीफायनलमध्ये अर्जेन्टिनाशी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com