Tokyo Olympic: वंदनाचा 'वंदनीय' इतिहास

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) शानदार प्रदर्शन करत भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा 4-2 ने (South Africa) धुव्वा उडवला. भारताकडून कमलप्रीत कौर (Kamalpreet Kaur) ही असा विक्रमी स्कोर नोंदविणारी खेळाडू ठरली आहे.
Vandana Kataria
Vandana KatariaDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय महिला संघांनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) शानदार प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) धुव्वा उडवला. या सामन्याची हिरो ठरली ती भारतीय हॉकी संघातील अष्टपैलू खेळाडू वंदना कटारिया. (Vandana Kataria) वंदनाने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात तीन गोल करत नवा इतिहास रचला. भारतीय महिला हॉकी संघाकडून वंदनाने नवा विक्रम केला. ऑलिम्पिकमध्ये गोलची हॅट्रिक करणारी वंदना पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला 4-3 नं पराभूत करत भारतीय महिला संघानं स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. याआधीच्या सामन्यात भारताने शुक्रवारी आयर्लंडला धुळ चारली होती. भारतीय महिला संघानं मिळवलेल्या या विजयाने क्वार्टर फायनलच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र आता भारताला आज होणाऱ्या सामन्यामध्ये आयर्लंडच्या पराजयाची वाट पाहावी लागणार आहे.

Vandana Kataria
Tokyo Olympics: चक दे इंडिया म्हणत हॉकीत भारताने जपानला 5-3 ने चारली धूळ

भारतीय महिला हॉकी संघानं सामना सुरु होताच पहिल्याच मिनिटात गोल करत आघाडी घेतली. त्यानंतर क्वार्टरच्या शेवटच्या क्षणामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने गोल करत बरोबरी साधली होती. मात्र भारतीय संघानं दुसऱ्या क्वार्टरमध्ये पुन्हा गोल करत आघाडी घेतली. परंतु दक्षिण आफ्रिकेनं शेवटच्या क्षणामध्ये गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर लगेच भारतीय संघानं पुन्हा तिसरा गोल नोंदवत आघाडी घेतली मात्र याच क्वार्टरमध्ये दक्षिण आफ्रिकेनं पुन्हा एक गोल करत 3-3 अशी बरोबरी साधली. मात्र शेवटच्या क्वार्टरकमध्ये वंदनाने संघांसाठी तिसरा आणि चौथा गोल नोंदवत पुन्हा सरशी मिळवून दिली.

Vandana Kataria
Tokyo Olympics: बॉक्सिंगमध्ये लोव्हलिनाने केले भारताचे पदक निश्चित

कमलप्रीतनं रचला इतिहास

कमलप्रीतनं डिस्कर थ्रो प्रकारात नवा इतिहास रचला आहे. तिने आपल्या तिसऱ्याच प्रयत्नात 64 मीटर स्कोर झळकावला. भारताकडून कमलप्रीत कौर ही असा विक्रमी स्कोर नोंदविणारी खेळाडू ठरली आहे. कमलप्रीतने स्पर्धेतील फायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. या सोबतच ती सुवर्ण पदकासाठी तिने पहिले पाऊल पुढे टाकले आहे. ग्रुप बीमध्ये कमलप्रीतने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 63.97 मीटर एवढा स्कोर नोंदविला होता. तर पहिल्या प्रयत्नात 60.25 मीटर एवढा स्कोर नोंदविण्यात तिला यश आलं होतं. दोन्ही ग्रुपमध्ये कमलप्रीत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्यासह ती फायनलमध्येही पोहोचली असून तिने फायनलमध्ये उत्तम कामगिरी केल्यास भारताला अजून एक पदक मिळवून देऊ शकते.

सीमा पुनियाचं आव्हान संपुष्टात

सीमा पुनियाचं डिस्कस थ्रोमधील आव्हान संपुष्टात आले. फायनलसाठी सीमा पूनिया क्वालीफाय करु शकली नाही. सीमा पुनिया क्वालिफिकेशन राउंडमध्ये 16 व्या क्रमांकावर राहीली, यामुळे तिचा टोकियो स्पर्धेतील प्रवास थांबला आहे.

Vandana Kataria
Tokyo Olympics: सिंधुची विजयी घौडदौड कायम, हॉकीत मात्र महिलांचा पराभव

अतनु दास क्वार्टर फायनलमधून बाहेर

टोकियो ऑलिम्पिकमधील तिरंदाजीमध्ये दिपीका नंतर एकमेव आशा म्हणून उरलेल्या अतनु दासने शेवटी निराशा केली आहे. पुरुष एकेरी स्पर्धेतीत क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या ताकाहारु फुरुकावा कडून 4- 6 पराभूत झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com