I-League Football
I-League FootballDainik Gomantak

I-League Football: ‘ट्राऊ’ने पिछाडीवरून चर्चिल ब्रदर्सला नमविले

विजयासह इंफाळ येथील संघ आता तिसऱ्या क्रमांकावर
Published on

I-League Football: आय-लीग सामन्यात दोन वेळा पिछाडीवर पडूनही टिड्डिम रोड ॲथलेटिक युनियन (ट्राऊ) संघाने माजी विजेत्या गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सला 3-2 असे नमविले. या कामगिरीसह इंफाळ-मणिपूर येथील संघ आता गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी आला आहे.

सामना इंफाळ येथील खुमान लाम्पाक स्टेडियमवर झाला. ट्राऊ संघाच्या सलाम रंजन सिंग याने 38व्या मिनिटास स्वयंगोल केल्यामुळे चर्चिल ब्रदर्सला पूर्वार्धात आघाडी मिळाली. बदली खेळाडू बिल्लू तेली याने 57व्या मिनिटास यजमान संघास १-१ अशी बरोबरी साधून दिली.

I-League Football
Indian Super League: बलाढ्य मुंबई सिटीसमोर एफसी गोवाचा निभाव लागणार का? आकडेवारी काय सांगते

66व्या मिनिटास बदली खेळाडू कपिल होबळे याने रिबाऊंडवर केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सला 2-1 अशी आघाडी मिळाली, पण ती जास्त काळ राहिली नाही. 67व्या मिनिटास कोमरॉन तुर्सूनोव्ह याच्या गोलमुळे ट्राऊ संघाने 2-2 अशी बरोबरी साधली.

चर्चिल ब्रदर्सचा बचावपटू पोनिफ वाझ याने गोलक्षेत्रात चेंडू हाताळल्यामुळे ट्राऊ संघाला पेनल्टी फटका मिळाला. 78व्या मिनिटास फर्नांडिन्हो याने अचूक नेम साधत ट्राऊ संघाला 3-2 असे महत्त्वपूर्ण वर्चस्व मिळवून दिले.

I-League Football
Margao Crime : ख्रिसमस दिवशी गोव्यात झाला खून, तब्बल चार वर्षांनी दिल्लीच्या कामगाराला झाली जन्मठेप

ट्राऊ संघाचा हा 16 सामन्यांतील आठवा विजय असून 26 गुणांसह त्यांना गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधता आली. चर्चिल ब्रदर्सला सहावा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 17 लढतीनंतर 23 गुणांसह त्यांची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली.

पराभवाची सव्याज परतफेड

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात वास्को येथे 20 डिसेंबर रोजी चर्चिल ब्रदर्सने ट्राऊ संघाचा 6-1 असा धुव्वा उडविला होता. त्या पराभवाची सव्याज परतफेड ट्राऊ संघाने शुक्रवारी घरच्या मैदानावर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com