Thomas Cup 2022 Final: भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने 73 वर्षानंतर रचला इतिहास

73 वर्षांत प्रथमच फडकावला तिरंगा
Thomas Cup 2022 India won their first Thomas Cup title after beating holders and 14-time champions Indonesia
Thomas Cup 2022 India won their first Thomas Cup title after beating holders and 14-time champions IndonesiaDanik Gomantak
Published on
Updated on

भारताने रविवारी थायलंडमधील इम्पॅक्ट एरिना येथे झालेल्या अंतिम सामन्यात होल्डर्स आणि 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव करून पहिले थॉमस कप विजेतेपद भारताच्या नावाने केले आहे. किदाम्बी श्रीकांतने जोनाटन क्रिस्टीचा 21-15, 23-21असा सरळ पराभव करून भारताने एकही सामना न गमावता विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. (Thomas Cup 2022 India won their first Thomas Cup title after beating holders and 14-time champions Indonesia)

Thomas Cup 2022 India won their first Thomas Cup title after beating holders and 14-time champions Indonesia
Thomas Cup 2022 Final: भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने 73 वर्षानंतर रचला इतिहास

भारतीय टीमने मलेशिया आणि डेन्मार्क सारख्या टीमचा पराभव करत पहिल्यांदा फायनलमध्ये जागा बनवली होती. अशाच परिस्थितीत टीमचा आत्मविश्वास खूप वाढला होता. तर फायनलमध्ये 14 वेळा चॅम्पियन्सचा रेकॉर्ड असलेल्या इंडोनेशियाचा नमवत इतिहास रचला आहे.

या स्पर्धेत इंडोनेशियाची कामगिरी चांगली राहिली होती. या स्पर्धेत इंडोनेशिया एकंही सामना हरली नव्हती. तर भारतीय टीमला ग्रुप स्टेजमध्ये चायनीज तैपेईविरुद्ध एकमेव पराभव पत्करावा लागला. पण आता भारताने अंतिम फेरीत इंडोनेशियाचा पराभव केला आहे.

क्रिस्टी हा इंडोनेशियाचा मोठा नावाजलेला खेळाडू आहे, पण, श्रीकांतने त्यांना सहज चिरडले. सामना तिसऱ्या गेमपर्यंतही गेला नाही, फक्त दोन गेममध्ये श्रीकांतने क्रिस्टीला आपल्या भारताचा खेळ दाखवून दिला. इंडोनेशिया 14 वेळा चॅम्पियन असेल, पण यावेळी भारत विजेतेपद पटकावणार असल्याचे स्पष्ट केले.

श्रीकांतच्या विजयाने भारत चॅम्पियन झाला

श्रीकांतने क्रिस्टीविरुद्धचा सामना 21-15 आणि 23-22 असा जिंकला. निकालातील फरक हे सांगण्यासाठी पुरेसा आहे की पहिल्या गेममध्ये इंडोनेशियाच्या शटलरने आजूबाजूलाही फटकेबाजी केली. दुसरा गेम निश्चितच चुरशीचा होता. एकदा असे वाटले की श्रीकांतला तिसरा गेम देखील खेळावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com