ICC मेन्स टेस्ट प्लेयर ऑफ द ईयर अवार्ड 2021 मध्ये 'या' भारतीय खेळाडूची झाली निवड

ICC ने 2021 च्या मेन्स टेस्ट प्लेयर आफ द ईयर अवार्ड 2021मध्ये चार खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या चार खेळाडूंमध्ये केवळ भारतीय खेळाडू आर अश्विनचा (R. Ashwin) समावेश होता.
R. Ashwin

R. Ashwin

Dainik Gomantak 

Published on
Updated on

ICC ने 2021 च्या मेन्स टेस्ट प्लेयर आफ द ईयर अवार्ड 2021मध्ये चार खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या चार खेळाडूंमध्ये केवळ भारतीय खेळाडू आर अश्विनचा (R. Ashwin) समावेश होता. आर अश्विन व्यतिरिक्त इतर तीन खेळाडूंमध्ये इंग्लंड क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार जो रूट, (Joe Root) न्यूझीलंडचा (new zealand) वेगवान गोलंदाज काइल जेमिसन आणि श्रीलंका क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार दिमुश करुणारत्ने (dimuth karunaratne) यांचा समावेश आहे. आता या चार खेळाडूंपैकी कोणाला आयपीएल 2021 चा सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडूचा किताब मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दरम्यान, 2021 सालातील कसोटी क्रिकेटमधील या चार खेळाडूंच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, जो रुटने 15 कसोटी सामन्यांमध्ये 61 च्या सरासरीने 1708 धावा केल्या आहेत, ज्यात 6 शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. आर अश्विनबद्दल बोलायचे झाले तर, या वर्षात त्याने 8 कसोटी सामन्यांमध्ये 16.33 च्या सरासरीने 52 विकेट्स (Centurion Test wickets and runs are not included) घेतल्या आहेत. चेंडूसोबतच अश्विनने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 337 धावा केल्या आहेत, ज्यात इंग्लंडविरुद्ध (England) चेन्नई कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातील शतकाचा समावेश आहे.

<div class="paragraphs"><p>R. Ashwin</p></div>
केएल राहुल इतिहास घडवणार? रहाणेसाठी देखील 'ही' सुवर्णसंधी

तसेच, रुट आणि अश्विन व्यतिरिक्त, काइल जेमिसनच्या (kyle jamieson) कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडच्या या वेगवान गोलंदाजासाठी हे वर्ष भरभराटीचे गेले. त्याने अलीकडेच त्याच्या 9 कसोटी सामन्यांमध्ये 50 बळी पूर्ण केले आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्धच्या त्याच्या प्रभावी कामगिरीबद्दल त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. भारताविरुद्धच्या या सामन्यात त्याने 7 विकेट घेतल्या आणि 16 चेंडूत 21 धावा करत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. त्याचबरोबर त्याने यावर्षी 5 कसोटी सामन्यात 27 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, दिमुथ करुणारत्नेने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये धावा करण्यात सातत्य राखले आहे. त्याने यावर्षी 9 कसोटी सामन्यांमध्ये 69.38 च्या सरासरीने 902 धावा केल्या असून त्यात चार शतकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com