केएल राहुल इतिहास घडवणार? रहाणेसाठी देखील 'ही' सुवर्णसंधी

वासिम जाफरने 2007 च्या केपटाऊन कसोटीत 116 धावा केल्या होत्या. मात्र त्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
KL Rahul Ajinkya Rahane

KL Rahul Ajinkya Rahane

Dainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेंच्युरियन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारायची आहे. पावसामुळे दुसऱ्या दिवशीचा सामना रद्द झाला. परिणामी, दुसऱ्या दिवसअखेर भारताची धावसंख्या 3 बाद 272 अशी आहे. सलामीवीर केएल राहुल 122 आणि फलंदाज अजिंक्य रहाणे 40 धावा करून क्रीजवर आहेत.

केएल राहुल (KL Rahul) इतिहास घडवणार?

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा केएल राहुलवर असतील. दक्षिण आफ्रिकेच्या स्टेडियमवर आतापर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला द्विशतक झळकावता आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक कसोटी धावसंख्येचा विक्रम फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, तेंडुलकरने जानेवारी 1997 मध्ये केपटाऊन कसोटीत 169 धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत केएल राहुल तेंडुलकरच्या धावसंख्येच्या अवघ्या 47 धावा दूर आहे. केएल राहुल हा दक्षिण आफ्रिकेच्या स्टेडियमवर कसोटी शतक झळकावणारा दहावा भारतीय फलंदाज आहे.

<div class="paragraphs"><p>KL Rahul Ajinkya Rahane</p></div>
U-19 Asia Cup: भारताच्या युवा स्टार्सचा शानदार विजय, उपांत्य फेरीत मारली धडक!

त्याच्याआधी केवळ प्रवीण अमरे, सचिन तेंडुलकर, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, वसीम जाफर, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांना ही कामगिरी करता आली. विशेष म्हणजे तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेत पाच तर विराट कोहलीने दोन वेळा कसोटी शतके झळकावली आहेत. केएल राहुल हा सलामीवीर म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर शतक झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी वासिम जाफरने 2007 च्या केपटाऊन कसोटीत 116 धावा केल्या होत्या. मात्र त्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

रहाणेसाठी सुवर्णसंधी

अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) शतक ठोकून एक वर्ष झाले आहे. रहाणेने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. मेलबर्नमधील त्या सामन्यात रहाणेने 112 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता रहाणे तिसऱ्या दिवशी शतक झळकावून टीकाकारांना सडेतोड उत्तर देऊ शकतो. खेळ अर्धा तास आधी म्हणजेच भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरू होईल. उरलेले तीन दिवस 98-98 षटकांचे असतील, परंतु हे सर्व हवामानावर अवलंबून आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सेंच्युरियनमधील सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी हवामान (Weather) योग्य राहण्याची शक्यता आहे. मात्र, पाचव्या दिवशी पावसाची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com