Shadab Khan: 'शादाबने मॅच हरवली', माजी लष्करप्रमुखांचा आरोप; पाक खेळाडूने दिले हे उत्तर

Qamar Javed Bajwa: T20 विश्वचषक 2022 च्या फायनलमध्ये पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता.
Qamar Javed Bajwa
Qamar Javed BajwaDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Cricket Team: T20 विश्वचषक 2022 च्या फायनलमध्ये पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. एक वेळ अशी आली होती की, झिम्बाब्वेविरुद्ध एका धावसंख्येने पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान गट फेरीतून बाद होण्याच्या मार्गावर पोहोचला होता. मात्र यानंतर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्याने पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा झाला. आता पीसीबीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी शादाब खानवर सामना हरल्याचा आरोप केला, ज्याला शादाब खानने मजेशीर उत्तर दिले आहे.

असा सवाल लष्करप्रमुखांनी केला

पीसीबीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा म्हणाले की, 'शादाब खान टी-20 क्रिकेटच्या बाबतीत खूप चांगला खेळाडू आहे. तो एक महान अष्टपैलू खेळाडू आहे, पण झिम्बाब्वेविरुद्धच्या (Zimbabwe) सामन्यात आम्हाला निराश केले. षटकार मारल्यानंतर त्याला पुढच्या चेंडूवर षटकार मारण्याची अजिबात गरज नव्हती.'

Qamar Javed Bajwa
T20 World Cup: रोहित शर्मा आणि विराट कोहली पुढील T20 विश्वचषक संघाचा भाग असतील का?

शादाब खानने हे उत्तर दिले

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान (Shadab Khan) याने अतिशय मजेशीरपणे उत्तर दिले. तो म्हणाला की, 'सर, तो कुदरत का निजाम है. मी आऊट झाल्यानंतर अंतिम फेरी गाठली.' अशा उत्तरानंतर उपस्थित सर्व लोक हसू लागले. आता त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Qamar Javed Bajwa
T20 World Cup 2022: सलग 8 वा T20 विश्वचषक खेळणार हे दोन धाकड, जाणून घ्या

अंतिम फेरीत पराभूत झाले

T20 विश्वचषक 2022 च्या फायनलमध्ये पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. याआधी, सुरुवातीच्या टप्प्यात पाकिस्तानला भारताकडून 4 विकेटने आणि झिम्बाब्वेकडून 1 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका पाकिस्तानला वाटत होता. मात्र नंतर नशिबाने साथ दिल्याने पाकिस्तानी संघ अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com