Flashback 2022: 2022 मध्ये ‘या’ खेळाडूंनी क्रिकेटला केला अलविदा, पाहा कोण आहेत

या वर्षी काही खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आपल्या चाहत्यांना धक्का दिला आहे.
Flashback 2022
Flashback 2022Dainik Gomntak

क्रिकेट या जगप्रसिद्ध खिळामध्ये २०२२ मध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. क्रिकेट विश्वाच्या दृष्टीने हे वर्ष खूप महत्वपूर्ण ठरले. २०२२ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक आणि आशिया चषक पार पडला. ज्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन झाले. त्याचबरोबर या वर्षी काही खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आपल्या चाहत्यांना धक्का दिला आहे. त्यामुळे आज आपण २०२२ मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.

सुरेश रैना –

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनाने देशांतर्गत क्रिकेटलाही अलविदा केला आहे. सुरेश रैनाने ६ सप्टेंबरला ट्विटद्वारे याची घोषणा केली होती. सुरेश रैनाच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने १०९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ६८७१ धावा केल्या. ज्यात १४ शतके आहेत. आणि सर्वोत्तम धावसंख्या २०४ नाबाद होती.

रॉबिन उथप्पा –

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पा याने केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाच नाही तर क्लब क्रिकेटलाही अलविदा केला आहे. त्याने हा निर्णय १४ सप्टेंबरला घेतला. तो आयसीसी टी-२० विश्वचषकाचे पहिले विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचा सदस्य राहिला आहे. त्याने आता सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. उथप्पाने भारतासाठी ४६ एकदिवसीय आणि १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्‍याने ६ अर्धशतकांसह वनडेमध्‍ये ९३४ धावा केल्या. तर टी-२० मध्ये त्याने १ अर्धशतकासह २४९ धावा केल्या होत्या.

Flashback 2022
Rishabh Pant: धोनीला भेटण्यासाठी पंतने गाठली थेट दुबई! पार्टीदरम्यानचा फोटो चर्चेत

मिताली राज –

मिताली राजने या यावर्षी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या निवृत्तीबद्दल माहिती दिली होती. २६ जून १९९ रोजी आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मिताली राजने २७ मार्च २०२२ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना खेळला. यादरम्यान त्याने १२ कसोटी, २३२ एकदिवसीय आणि ८९ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. मितालीने कसोटीत १ शतक आणि ४ अर्धशतकांसह ६९९ तर वनडेमध्ये ७ शतके आणि ६४ अर्धशतकांसह ७८०५ धावा जोडल्या.

Flashback 2022
IND vs SL: 'रेस्ट दिलीये की ड्रॉप केलंय?', टीम इंडियाची घोषणा होताच भन्नाट मीम्स व्हायरल

झुलन गोस्वामी –

भारतीय महिला संघाची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने २० ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिने कारकिर्दीतील शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला. झूलन गोस्वामीने २० वर्षांच्या यशस्वी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला. या स्टार वेगवान गोलंदाजाने भारतासाठी १२ कसोटी, २०४ एकदिवसीय आणि ६८ टी-२० सामने खेळले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com