IND vs SL: 'रेस्ट दिलीये की ड्रॉप केलंय?', टीम इंडियाची घोषणा होताच भन्नाट मीम्स व्हायरल

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर अनेक मीम्स व्हायरल झालेत.
Team India memes
Team India memesDainik Gomantak
Published on
Updated on

Team India: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 3 जानेवारीपासून 3 सामन्यांची वनडे आणि 3 सामन्यांची टी20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकांसाठी मंगळवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघात अनेक बदल केलेलेही दिसून आले आहेत.

श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, विराट कोहली अशा काही प्रमुख खेळाडूंना टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तसेच रोहित शर्मा दुखापतीमुळे टी20 मालिकेत खेळणार नाही आणि केएल राहुल देखील लग्नामुळे या मालिकेला मुकणार असल्याची चर्चा आहे.

Team India memes
Team India: टीम इंडियात 'या' खेळाडूला संधी मिळणे झाले बंद, आशिया कप 2022 मध्ये...!

त्यामुळे टी20 मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळाली आहे. यात मुकेश कुमार आणि शिवम मावी यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांना पदार्पणाचीही संधी मिळू शकते.

तसेच राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड यांनाही भारताच्या टी20 संघात संधी मिळाली आहे. त्याचबरोबर हार्दिक पंड्याला रोहितच्या अनुपस्थितीत टी20 मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद, तर सूर्यकुमार यादवकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

मात्र, एकिकडे टी20 संघात युवा खेळाडूंनी जागा मिळवली असतानाच वनडे संघातून शिखर धवनला वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर केएल राहुलकडूनही उपकर्णधारपद काढून घेण्यात आले असून हार्दिक पंड्याकडे वनडे संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

वनडे मालिकेतून रोहित भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. तसेच पंतचा टी20बरोबरच वनडे संघातही समावेश करण्यात आलेला नाही. असे अनेक बदल भारतीय संघांमध्ये करण्यात आल्याने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक मीम्सही यादरम्यान व्हायरल होत आहेत.

श्रीलंकाविरुद्धचे टी20 सामने पुढील वर्षात अनुक्रमे 3 जानेवारी, 5 जानेवारी आणि 7 जानेवारी रोजी होणार आहेत. तसेच वनडे सामने अनुक्रमे 10 जानेवारी, 12 जानेवारी आणि 15 जानेवारी रोजी होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com