Goa: विद्यार्थी व क्रिडा संघटनांसाठी मैदाने खुली करण्याची जीएसएफची मागणी

मैदाने बंद असल्याने खेळाडुंच्या प्रशिक्षण व सरावावर बंधने आली आहेत. तसेच या मैदानांना प्रसिद्ध गोमंतकीय क्रि़डापटूंची नावे द्यावीत अशी मागणी फाऊंडेशनचे सचीव लिसियो रोंकोन यानी पत्रकारांशी बोलताना केली.
विद्यार्थी व क्रिडा संघटनांसाठी मैदाने खुली करण्याची जीएसएफची मागणी
विद्यार्थी व क्रिडा संघटनांसाठी मैदाने खुली करण्याची जीएसएफची मागणी Dainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: सरकारने राज्यातील सर्व मैदाने (grounds in the state) शालेय विद्यार्थी व क्रिडा संघटनांसाठी खुली करावी अशी मागणी गोवा स्पोर्टस फाऊंडेशनने (Goa Sports Foundation) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्याकडे केली आहे. मैदाने बंद असल्याने खेळाडुंच्या प्रशिक्षण व सरावावर बंधने आली आहेत. तसेच या मैदानांना प्रसिद्ध गोमंतकीय क्रि़डापटूंची (Gomantak athletes) नावे द्यावीत अशी मागणी फाऊंडेशनचे सचीव लिसियो रोंकोन यानी पत्रकारांशी बोलताना केली.

विद्यार्थी व क्रिडा संघटनांसाठी मैदाने खुली करण्याची जीएसएफची मागणी
IPL 2021: पोलार्डच्या एका चुकीने मुंबई इंडियन्सचा विजयरथ CSK ने रोखला

राज्य सरकारने 300 कोटी रुपये खर्च करुन राज्यात क्रिडा साधन सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सुविधांचा वापर केवळ राज्यातील क्रिडापटूंसाठी व्हावा असे फाऊंडेशनला वाटते असे रोंकोन यानी सांगितले.

दिल्लीतील मैदान वापरासाठी खास योजना तयार करण्यात आली असुन त्याचा फायदा खेळाडु घेत आहेत. अशाच प्रकारची योजना प्रथम बांबोळी अ‍ॅथलेटिक स्टेडियमसाठी सुरु करावी व नंतर इतर शहरांतील मैदानांसाठी लागु करावी अशी सुचना फाऊंडेशनचे अध्यक्ष व स्पोर्टस ऑथोरिटी ऑफ इंडियाचे माजी कार्यकारी संचालक रॉक डायस यांनी सांगितले.

विद्यार्थी व क्रिडा संघटनांसाठी मैदाने खुली करण्याची जीएसएफची मागणी
भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्राची फेडरेशन विरोधात उच्च न्यायालयात धाव

सरकारने होतकरु खेळाडूंबरोबरच पारा क्रिडा प्रकारातील खेळाडू, दृष्टिहीन, बहिरे व स्पेशल ऑलिंपिक खेळाडूंसाठी ही मैदाने खुली करावी अशी मागणी डायस यांनी केली. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम व्हॉलिबॉल, बुद्धिबळ, बास्केटबॉल या क्रिडा प्रकारातील खेळाडुंना उपलब्ध करावा. त्यामुळे राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेच्या कमीत कमी 40 दिवस आधी सराव करण्याची संधी खेळाडूंना मिळेल असे डायस यांनी सुचविले. या साठी गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्षपदी असलले केंद्रिय राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनीही पुढाकार घ्यावा असे फाऊंडेशनला वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com