Female Cricketer Harassment Case: महिला क्रिकेटपटूनं उचललं टोकाचं पाऊल, प्रेमाच्या नावाखाली पाठलाग करणाऱ्या तरुणांवर गंभीर आरोप; क्रीडा वर्तुळात शोककळा

Under 19 Cricketer Nandini Passes Away: नुकतीच बीसीसीआयच्या (BCCI) अंडर-19 महिला क्रिकेट संघात निवड झालेल्या नंदिनी या होतकरु युवा महिला क्रिकेटपटूने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
Under 19 Cricketer Nandini Passes Away
Female Cricketer Harassment CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Under 19 Cricketer Nandini Passes Away: तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली. नुकतीच बीसीसीआयच्या (BCCI) अंडर-19 महिला क्रिकेट संघात निवड झालेल्या नंदिनी या होतकरु युवा महिला क्रिकेटपटूने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. नंदिनीच्या या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबावर आणि क्रीडा वर्तुळात शोककळा पसरली.

मूळची विकाराबाद जिल्ह्यातील संगयापल्ली गावाची असणारी नंदिनी, विकाराबादच्या मधू कॉलनीत आपल्या आजीच्या घरी राहून शिक्षणासोबतच क्रिकेटचे धडे गिरवत होती. या घटनेमुळे संतप्त झालेल्या तिच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी रस्त्यावर उतरुन जोरदार निदर्शने केली आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.

Under 19 Cricketer Nandini Passes Away
Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास नंदिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात तिने घरातील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. मृत नंदिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, शुक्रवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह शोकाकुल वातावरणात कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. दरम्यान, अनिल आणि कृष्णा नावाच्या दोन युवकांच्या सततच्या त्रासाला कंटाळूनच तिने हे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.

Under 19 Cricketer Nandini Passes Away
Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

अनिल नावाचा तरुण प्रेमाच्या नावाखाली तिचा सातत्याने पाठलाग करुन तिला मानसिक त्रास देत होता, तर कृष्णा त्याला मदत करत होता, असा आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी नंदिनीचा मोबाईल फोन जप्त केला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून तिला कोणी त्रास दिला का हे तपासण्यासाठी तिचे इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲप अकाउंट्स तपासले जात आहेत. या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करुन कठोर शिक्षा केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले असून, पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे आणि कठीण काळात त्यांना भावनिक आधार द्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.