खेळाडूपेक्षा संघ मोठा असतो; संघांमुळेच प्रगती कायम - ला लिगा

''भारतात स्पॅनिश फुटबॉल लीगचा विस्तार''
La Liga
La Liga Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: खेळाडूपेक्षा त्याचा संघ मोठा असतो. खेळाडू येतात आणि जातात, संघ टिकून राहतात आणि त्यामुळेच स्पर्धेची प्रगती कायम राहते, असे प्रतिपादन ला लिगा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक होजे अंतोनियो यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. (The team is bigger than the players; Progress is maintained due to teams )

स्पॅनिश फुटबॉलमधील अव्वल स्पर्धा असलेल्या ला लिगा स्पर्धेच्या भारतातील कार्यालयास पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत ला लिगा फुटबॉलचा देशात विस्तार झाला असून महाराष्ट्र-गोवा विभागातील मुसंडीसह लीगने भारतात प्रेक्षकसंख्येत दुसऱ्या क्रमांकापर्यंत झेप घेतल्याचे होजे अंतोनियो यांनी नमूद केले. यावेळी ला लिगा ग्लोबल नेटवर्कच्या भारतीय प्रतिनिधी आकृती वोहरा यांचीही उपस्थिती होती.

La Liga
IPL 2022 Qualifier 1: यजुवेंद्र दाखवणार जलवा, रेकॉर्डला घालणार गवसणी

मेस्सी, ख्रिस्तियानोविनाही ला लिगाची वाढ

ला लिगाच्या लोकप्रियतेविषयी होजे अंतोनियो म्हणाले, (लिओनेल) मेस्सी, ख्रिस्तियानो (रोनाल्डो) यांनी ला-लिगा स्पर्धेतील संघांना सोडचिठ्ठी दिली, पण त्याचा स्पर्धेवर परिणाम झाला नाही. ला लिगाची वाढ कायम आहे. याचाच अर्थ असा होतो, की क्लब हा खेळाडूंपेक्षा मोठा आहे. खेळाडू येतात आणि जातात, संघ कायमस्वरूपी राहतात.

La Liga
धेंपो क्लबने जिंकला बांदोडकर करंडक

गोव्यात ला लिगासाठी मजबूत पाया

गोवा राज्य फुटबॉलप्रेमी आहे. याठिकाणी ला लिगासाठी मजबूत पाया असल्याचा दावाही होजे अंतोनियो यांनी केला. ला लिगा ही एक स्पर्धा नसून ब्रँड आहे, त्यामुळे भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी सहकार्य करण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी नमूद केले. लीगने देशातील चाहतावर्ग जोडण्यासाठी प्रयत्न करताना सोशल मीडियाचा खुबीने वापर केला, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com