धेंपो क्लबने जिंकला बांदोडकर करंडक

टी-20 क्रिकेट: करिमाबादवर सात विकेटने मात; विकास, दिव्यांगची छाप
Cricket News
Cricket News Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोलंदाजांची सुरेख कामगिरी, तसेच कर्णधार स्नेहल कवठणकर याने मुकुल कसाना याच्यासह दिलेली दमदार सलामी या बळावर धेंपो क्रिकेट क्लबने पणजी जिमखान्याच्या बांदोडकर करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धा जिंकली. अंतिम लढतीत त्यांनी मंगळवारी करिमाबाद क्लबला सात विकेट आणि 12 चेंडू राखून सहजपणे हरविले. (Dhempo Club wins Bandodkar Trophy)

धेंपो क्लबचे अष्टपैलू खेळाडू दिव्यांग हिंगणेकर व विकास सिंग उल्लेखनीय ठरले. विकास सामन्याचा, तर दिव्यांग स्पर्धेचा मानकरी ठरला. करिमाबादचा तुनीष सावकार याला उत्कृष्ट फलंदाज, तर धेंपो क्लबचा अझीम काझी याला उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळाला. अंतिम सामना कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला.

Cricket News
मालवणमध्ये पर्यटकांची बोट बुडाली; दोघांचा मृत्यू, दोघांची स्थिती गंभीर

बक्षीस वितरणास स्पर्धा पुरस्कर्ते समीर काकोडकर, गोवा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष चेतन देसाई, पणजी जिमखान्याचे पदाधिकारी राजेश खंवटे, गिरीश पारेख, नरहर ठाकूर, प्रशांत काकोडे, तन्मय खोलकर, सर्फराज खोलकर यांची उपस्थिती होती.

Cricket News
माविन गुदिन्होंना वीज घोटाळा प्रकरणात घरचा आहेर

धेंपो क्लबचे वर्चस्व

अझीम काझी (3-29), विकास सिंग (2-18), जगदीश पाटील (2-19), दिव्यांग हिंगणेकर (1- 19) या धेंपो क्लबच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना करिमाबाद क्लबला 9 बाद 116 असे रोखले. 6 बाद 56 वरून करिमाबाद संघाला मोठी धावसंख्या रचणे अशक्य ठरले. नंतर स्नेहल कवठणकरने (40) मुकुल कसाना (35) याच्या साथीत 10.2 षटकांत 74 धावांची सलामी देत धेंपो क्लबच्या विजयाचा पाया भक्कम केला. विकासने 14 चेंडूंत झटपट नाबाद 19 धावा करून धेंपो क्लबचे विजेतेपद साकार केले.

संक्षिप्त धावफलक

करिमाबाद क्रिकेट क्लब : 20 षटकांत 9 बाद 116 (कश्यप बखले 15, तुनीष सावकार 12, अझान थोटा 10, दीपराज गावकर 22, वेदांत नाईक 11, लक्मेश पावणे नाबाद 21, दिव्यांग हिंगणेकर 1- 19, जगदीश पाटील 2-19, अझीम काझी 3-29, विकास सिंग 2-18) पराभूत वि. धेंपो क्रिकेट क्लब : 18 षटकांत 3 बाद 120 (स्नेहल कवठणकर 40, मुकुल कसाना 35, कीनन वाझ 17, विकास सिंग नाबाद 19, सचिन मिश्रा 3-21)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com