विराट कोहलीवरून BCCI मध्ये वादंग, ODI चं कर्णधारपदही धोक्यात ?

विराट कोहलीच्या कर्णधारपदाचा अंतिम निर्णय BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह घेतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.
BCCI will take decision on Virat Kohli captaincy for ODI and test cricket
BCCI will take decision on Virat Kohli captaincy for ODI and test cricket Dainik Gomantak
Published on
Updated on

विराट कोहलीने (Virat Kohli) आपला T20 कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यांनतर आता विराटला वनडे कर्णधारपदी कायम ठेवण्याबाबतचा निर्णय या आठवड्यात घेतला जाणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समिती आगामी दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यासाठी संघाची निवड करणार आहे. संघ निवडीच्या या प्रक्रियेदरम्यान, भविष्यात एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपद विराट कोहलीच्या हातात राहणार की नाही हे देखील स्पष्ट होणार आहे. भारतीय संघाच्या या आगामी दौऱ्याबाबत बोलताना BCCI वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार COVID-19 चे नवीन प्रकार दक्षिण आफ्रिकेत सापडले असले तरी ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि हा दौरा पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसारच होईल.(BCCI will take decision on Virat Kohli captaincy for ODI and test cricket)

2022 मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T-20 विश्वचषकासह बहुतेक T-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील. सध्याच्या वेळापत्रकानुसार, पुढील सात महिन्यांत भारताला फक्त नऊ एकदिवसीय सामने खेळायचे आहेत, त्यापैकी सहा परदेशात त्याचबरोबर भारतात 3 वनडे सामने होणार आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला 3 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 4 T-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे.

BCCI मधील एक गट कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदावर ठेवण्याच्या बाजूने आहे, तर दुसरा गट T-20 आणि एकदिवसीय दोन्ही संघांचे कर्णधारपद एकाच खेळाडूकडे सोपवण्याच्या बाजूने आहे जेणेकरून रोहित शर्माला चांगली तयारी करण्याची संधी मिळेल जेणेकरून 2023 एकदिवसीय विश्वचषकासाठी . याप्रकरणी अंतिम निर्णय BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly ) आणि सचिव जय शाह घेतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

याआधी विराट कोहलीने 2021 च्या T-20 विश्वचषकानंतर T-20 कर्णधारपद सोडले होते. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याने ही घोषणा केली होती . 2022 मध्ये भारताला फक्त 9 एकदिवसीय सामने खेळायचे असल्याने काही लोकांना असे वाटते की त्याने कर्णधारच राहावे. परंतु, अनेकांच्या दृष्टीने पुढील वर्षी होणारे 9 एकदिवसीय सामने रोहित शर्मासाठी 2023 विश्वचषक स्पर्धेची तयारी पूर्ण करण्यासाठी चांगली संधी असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com