IND vs NZ : या महिन्यात रंगणार Team India आणि New Zealand मध्ये सामना; हे आहे वेळापत्रक

IND vs NZ : T20 विश्वचषक 2022 (T20 WC 2022) मधून बाहेर पडल्यानंतर आता टीम इंडिया न्यूझीलंडचा दौरा करणार आहे.
IND vs NZ | Team India
IND vs NZ | Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs NZ : T20 विश्वचषक 2022 (T20 WC 2022) मधून बाहेर पडल्यानंतर आता टीम इंडिया न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात या महिन्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे.

पुढील आठवड्यात संघांमध्ये तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाने आधीच आपला संघ जाहीर केला आहे. (IND vs NZ)

IND vs NZ | Team India
Jio 5G Network : रिलायन्स जिओने या दोन मोठ्या शहरांमध्ये सुरू केली 5G सेवा, यूजर्सला मिळणार हा फायदा

T20 मालिकेचे वेळापत्रक : पहिला T20 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टन येथे खेळवला जाईल. दुसरा T20 20 नोव्हेंबर रोजी माउंट मोंगनुई येथे आणि तिसरा 22 नोव्हेंबर रोजी नेपियर येथे होणार आहे. तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सुरू होतील.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक : पहिला एकदिवसीय सामना 25 नोव्हेंबर रोजी ऑकलंड येथे होणार आहे. दुसरी वनडे 27 नोव्हेंबरला हॅमिल्टनमध्ये आणि तिसरी वनडे 30 नोव्हेंबरला क्राइस्टचर्चमध्ये खेळवली जाईल. हे तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता सुरू होतील.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसोबतच दिनेश कार्तिक आणि आर अश्विन हे देखील या दौऱ्याचा भाग नसतील.

T-20 मालिकेसाठी टीम इंडिया : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (डब्ल्यूके), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, के. यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया : शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com