टिम इंडीया कोरोनाच्या विळख्यात; धवन, अय्यर, गायकवाड विलगिकरणात

वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी या घटनेनंतर मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला आहे.
Indian Cricket Team
Indian Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) बुधवारी कोविड -19 च्या विळख्यात आला. वरिष्ठ सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan), राखीव सलामीवीर रुतुराज गायकवाड आणि फलंदाज श्रेयस अय्यर यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील चार सदस्य कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19) आढळले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघ 31 जानेवारी रोजी अहमदाबादमध्ये होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडिया तीन दिवस आयसोलेशनमध्ये होती. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी या घटनेनंतर मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला आहे.

या मालिकेची सुरुवात अहमदाबादमध्ये 6 फेब्रुवारीपासून होणार आहे, जी भारताची 1000 वी वनडे मालीका असेल, परंतु भारतीय संघातील तीन खेळाडू या मालिकेमध्ये खेळू शकणार नाहीत. धवन, अय्यर आणि गायकवाड यांना आठवडाभर विलगिकरणात राहावे लागणार आहे. यानंतर, दोन नकारात्मक आरटी-पीसीआर (RT-PCR) निकालानंतरच ते संघात सामील होऊ शकतील. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'खेळाडूंमध्ये आजाराची लक्षणे दिसत नाहीत आणि आशा आहे की ते लवकरच बरे होतील.' या सामन्यामध्ये शिखर धवन खेळत नसल्याने काही क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा बघायला मिळणार.

Indian Cricket Team
भारताच्या वेगवान गोलंदाजाच्या खोडसाळपणाचा रंजक किस्सा

त्याहूनही निराशाजनक गोष्ट म्हणजे रुतुराज गायकवाडला गेल्या दीड वर्षात दुसऱ्यांदा कोविडची लागन झाली आहे. रुतुराज 2020 च्या UAEमध्ये IPL दरम्यान देखील पॉझिटिव्ह आढळला होता आणि त्याला खूप कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्याला 14 दिवस विलगीकरणात रहावे लागले होते. त्यामुळे त्याला यूएईमध्ये पहिल्या सहामाहीत खेळता आले नाही.

Indian Cricket Team
शार्दुल ठाकूर स्वत:ला म्हणतो खरा ऑलराऊंडर

कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त, विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविडसारखे वरिष्ठ खेळाडूंची कोविड चाचणी निगेटिव्ह आली. ज्यांचे कोविड निकाल नकारात्मक आले आहेत त्यांचे अनिवार्य विभाजन आज पूर्ण केले जाईल. आज पुन्हा निगेटिव्ह आढळल्यास ते जैविकदृष्ट्या सुरक्षित वातावरणात ठेवण्यात येइल, असे BCCIच्या आधिकाऱ्यांनी सांगितले. BCCI वैद्यकीय संघाच्या चाचणी प्रोटोकॉलनुसार, दररोज RT-PCR चाचणी केली जाते. खेळाडूमध्ये कोविडची लक्षणे आढळल्यास रॅपिड अँटीजेन किट संघाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com