भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर त्यात झहीर खानचे (Zaheer Khan) नाव पुढे असेल. या डावखुऱ्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीने संघाला अनेकदा यश मिळवून दिले आणि सामना जिंकणारा खेळाडू म्हणून उदयास आला.
झहीर 2003 च्या विश्वचषकात भारताकडून खेळला ज्यामध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला पण पराभूत झाला. 2011 मध्ये मात्र त्याने आपले स्वप्न पूर्ण केले आणि टीम इंडियाच्या विश्वचषक विजयात मोठी भूमिका बजावली. असाच एक झहीरच्या (Zaheer Khan) बालपणातील किस्सा सध्या समोर आला आहे. मैदानाच्या आत झहीरची आक्रमकता सगळ्यांनाच दिसली पण मैदानाबाहेर तो खूप विनोद करणारा खेळाडू होता. त्याच्यासोबत खेळलेले युवराज सिंग, हरभजन सिंग यांनी अनेकदा याचा खुलासा केला आहे. तो लहानपणापासूनच खोडकर होता.
झहीर बुडता बुडता वाचला
झहीर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर गावात राहत होता. त्याचे वडील फोटोग्राफर होते. तो वडिलांसोबत कालवा पाहण्यासाठी गेला होता आणि त्यावेळी त्याचा अपघात झाला. हा किस्सा आणि त्याच्या खोड्या झहीरने बीबीसीच्या जुन्या शो फेस टू फेसमध्ये सांगितले होता. "मी आणि माझा मोठा भाऊ कालव्याच्या पायऱ्यांवर उभे होतो. आम्ही शेवटच्या पायरीवर होतो आणि मला वाटले की आणखी एक पायरी खाली आहे आणि मी माझा पाय तिथे ठेवताच मी पडलो आणि जवळजवळ बुडालो. माझ्या काकांनी मला पाण्यात बुडण्यापासून वाचवले."
आजीचं ऐकले नाही
झहीर तीन वर्षांचा असताना त्याने आजीचे ऐकले नाही असेही त्याने सांगितले होते. "जेव्हा मी तीन वर्षांचा होतो तेव्हा माझी आजी माझी काळजी घ्यायची. तीने मला सांगितले की, विजेची तार लटकली आहे, त्याच्या जवळ जाऊ नकोस. मला इलेक्ट्रिक वायर म्हणजे काय हे जाणून घ्यायचे होते, म्हणून मी तिथे जाऊन त्याला स्पर्श केला"
असे घडले करिअर
भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत झहीर दुसऱ्या क्रमांकावर आहे. झहीरच्या नावावर 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 269 विकेट्स आहेत. मुंबईचा अजित आगरकर त्याच्या पुढे आहे. आगरकरने 191 सामन्यात 288 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर झहीरने भारतासाठी 92 कसोटी सामने खेळले असून 311 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. त्याने टी-20 मध्ये भारतासाठी 17 सामने खेळले आणि 17 विकेट घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.