Rohit Sharma: हिटमॅनचा वनडेतील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडणार 'हा' खेळाडू, श्रीलंकेविरुद्ध...

Highest ODI Score Record: वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Highest ODI Score Record: वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे. नोव्हेंबर 2014 मध्ये, त्याने ईडन गार्डन्सवर श्रीलंकेविरुद्ध 173 चेंडूत 264 धावांची शानदार खेळी खेळली होती. यादरम्यान त्याने 152.60 च्या स्ट्राईक रेटने 33 चौकार आणि 9 षटकार ठोकले. आत्तापर्यंत असे मानले जात होते की, रोहित शर्माचा हा विक्रम क्वचितच मोडला जाईल, परंतु अलीकडेच ईशान किशनने वनडेमध्ये ज्या प्रकारे द्विशतक झळकावले ते पाहता रोहितचा हा विक्रम आता सुरक्षित म्हणता येणार नाही.

दरम्यान, रोहित शर्मा (Rohit Sharma) हिटमॅन म्हणून प्रसिद्ध आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकापेक्षा जास्त वेळा द्विशतके झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 9 द्विशतके झाली आहेत, ज्यामध्ये रोहित शर्माने तीन द्विशतके झळकावली आहेत. रोहितशिवाय या यादीत मार्टिन गप्टिल (237), वीरेंद्र सेहवाग (219), ख्रिस गेल (215), फखर जमान (210), ईशान किशन (210) आणि सचिन तेंडुलकर (200) यांच्या नावांचा समावेश आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma: 'तो पुरेसा तंदुरुस्त आहे का?', रोहित शर्माच्या नेतृत्वावर कपिल देव यांचा सवाल

रोहितचा विक्रम गेल्या महिन्यातच मोडला गेला असता

डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) एकदिवसीय सामन्यात ईशान किशनने केवळ 131 चेंडूत 210 धावा केल्या होत्या. भारतीय डावाच्या 36 व्या षटकात तो बाद झाला. जर तो शेवटपर्यंत नाबाद राहिला असता, तर त्याने कदाचित रोहित शर्माचा सर्वात मोठ्या खेळीचा (264) विक्रमच मोडला नसता, तर एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले त्रिशतकही त्याने ठोकले असते.

दुसरीकडे, ईशान किशनने आतापर्यंत फक्त 10 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि तो हा मोठा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आला आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma: हिटमॅनचे कर्णधारपद धोक्यात? 'हा' बनू शकतो टीम इंडियाचा नवा टी20 कर्णधार

सूर्यकुमार यादवही हा विक्रम मोडू शकतो

सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीने धावा करतो, ते पाहता तो रोहित शर्माचा हा वनडे विक्रम मोडण्याचा दावेदार मानला जात आहे. सूर्याने आपल्या छोट्या टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत तीन शतके झळकावली आहेत. म्हणजेच, क्रिकेटमध्येही मोठी खेळी खेळण्याची त्याला सवय झाली आहे. या शतकांमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 200+ आहे. अशा परिस्थितीत जर त्याने वनडे क्रिकेटमध्ये 130 किंवा 140 चेंडू खेळले तर तो रोहितचा विक्रम मोडू शकतो.

Rohit Sharma
Rohit Sharma New Record: हिटमॅन रोहित शर्माने मोहम्मद अझरुद्दीनला टाकले मागे

रोहितचा विक्रम मोडणे शक्य

गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारे टी-20 क्रिकेटचा दबदबा वाढला आहे, फलंदाजांनी धडाकेबाज स्टाईलने धावा काढण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे रोहितचा विक्रम मोडीत काढणे शक्य आहे. आजकाल कसोटी क्रिकेटमध्येही फलंदाज टी-20 प्रमाणे धावा काढू लागले आहेत. वनडेतही घाईघाईत धावा केल्या जात आहेत. जॉस बटलर, हॅरी ब्रूक, अॅलेक्स हेल्स, कॅमेरॉन ग्रीन, फिन अॅलन असे अनेक फलंदाज आहेत, जे वनडे तसेच टी-20 मध्ये विस्फोटक फलंदाजी करतात. अशा स्थितीत रोहित शर्माचा विक्रम आगामी काळात केव्हाही मोडू शकतो, असे म्हणता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com